[svt-event title=”प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या” date=”28/10/2020,3:57PM” class=”svt-cd-green” ] दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने दि. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”राजू शेट्टी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल” date=”28/10/2020,3:35PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : राजू शेट्टी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल@rajushetti #Hospital pic.twitter.com/tJjnsBqtDW
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
[svt-event title=”शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र” date=”28/10/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही,तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे,उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्म वादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, असं शरद पवारांनी या पत्रात म्हटलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार – शरद पवार” date=”28/10/2020,1:53PM” class=”svt-cd-green” ] स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात आज हा विषय मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार – शरद पवार [/svt-event]
[svt-event title=”विरोधकांनी सभागृहात ‘शरद पवार होश मे आव’ अशा घोषणा दिल्या : शरद पवार” date=”28/10/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] कांद्याचे भाव वाढल्यानंतर विरोधकांनी सभागृहात ‘शरद पवार होश मे आव’ अशा घोषणा दिल्या, कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची वेळ येते तेव्हा पार्लिमेंट मध्ये चळवळ होते – शरद पवार [/svt-event]
[svt-event title=” कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून : शरद पवार” date=”28/10/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ] राज्य सरकार कडून जास्त अपेक्षा करू नये , कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही, व्यापाऱयांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यात बंदी , आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात – शरद पवार [/svt-event]
[svt-event title=”कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही- शरद पवार” date=”28/10/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद. कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही. शेतकरी कष्टाने उत्पादन घेतात. प्रमाण आणि दर्जा या दोन गोष्टींमध्ये नाशिकचा पहिला क्रमांक.बाजारातील चढ उतार याची झळ कांद्याला सर्वाधिक बसते – शरद पवार [/svt-event]
[svt-event title=” शरद पवारांची शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक” date=”28/10/2020,12:58PM” class=”svt-cd-green” ] नाशिक – शरद पवारांची शेतकरी आणि कांदा व्यापारी यांच्यासोबत बैठकीला सुरुवात, बैठकीला आमदार दिलीप बनकर , हेमंत टाकले , रवींद्र पगार उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांकडून माजी मंत्री विनायक पाटील यांना श्रद्धांजली, कुटुंबियांचं सांत्वन” date=”28/10/2020,12:42PM” class=”svt-cd-green” ] राज्याचे माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या निधनानंतर आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते. [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू” date=”28/10/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ]
खडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर?; राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरूhttps://t.co/dDQsUcrhtX#ncp #EknathKhadse #anandshinde #mlc
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश” date=”28/10/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] पुणे : जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावांत कोरोनाचा शिरकावचं नाही, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश, ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचं प्रमाण वाढलं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती, जिल्ह्यात सध्या 13 हजार एवढी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात” date=”28/10/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात, रत्नागिरीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण राज्याच्या टक्केवारी पेक्षा अधिक, कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 92.33 टक्के, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात मोठ्या संख्येनी कोरोनाच्या चाचण्यांवर भर [/svt-event]
[svt-event title=”दरमहा वेतनातून कापला जाणार हक्काचा बोनस द्या, अन्यथा आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा इशारा” date=”28/10/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे : दरमहा वेतनातून कापला जाणार हक्काचा बोनस न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा, महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा पालिका प्रशासनाला इशारा, नियमाप्रमाणे 8.33 टक्के बोनस दिला पाहिजे, शिवाय दरमहा कंत्राटी कामगारांच्या पगारातून पंधराशे ते तीन हजार इतकी रक्कम कापली जाते. त्यामुळे ही आमची हक्काची रक्कम आम्हाला मिळावी कंत्राटी कामगारांचे म्हणणे, कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांचा इशारा [/svt-event]
[svt-event title=”कमरेला पिस्तुल आणि हातात शस्त्र घेऊन दरोडा, नाशकात सात सराईत गुंडांना अटक” date=”28/10/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : कमरेला पिस्तुल आणि हातात शस्त्र घेऊन दरोडा, नाशिकच्या पेठ रोड परिसरातील घटनेनं गुन्हेगारांचं पोलिसांना थेट आव्हान, सात सराईत गुंडांना पोलिसांनी केली अटक, शस्त्रास्त्रांसह चार दुचाकी हस्तगत, महिलेवर हल्ल्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न, आरोपींवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल [/svt-event]
[svt-event title=”नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, 14 हजार हेक्टरवरील पीकं पाण्यात” date=”28/10/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : अतिवृष्टीचा जिल्ह्याला मोठा फटका, 14 हजार हेक्टरवरील पीकं गेली पाण्यात, ऑक्टोबरच्या पंधरवाड्यात सर्वाधिक नुकसान, निसर्ग चक्रीवादळात 530 हेक्टर वरील पीकं झाली आडवी, सोयाबीन, कांदा, मका पिकाचे सर्वाधिक नुकसान नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या 12 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द” date=”28/10/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे : जिल्ह्यातील भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या 12 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश, शिवाय या 12 विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, ताडीत क्लोरल हायड्रेट भेसळ करत असल्याचं समोर, यामुळे ताडी पिणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 16 ताडी विक्रेत्यांची तपासणी, 12 ताडी विक्रेत्यांवर कारवाई [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट, सेव्हनस्टार आणि विवेका रुग्णालयावर कारवाई” date=”28/10/2020,8:11AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट नागपूरातील सेव्हनस्टार आणि विवेका रुग्णालयावर कारवाई, कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळल्याने कारवाई, 76 रुग्णांचे अतिरिक्त पैसे परत करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश, दोन्ही रुग्णालयांना 23 लाख 96 हजार रुपये रुग्णांना परत करावे लागणार [/svt-event]
[svt-event title=”शरद पवार आज नाशिकमध्ये, स्वर्गीय विनायक दादा पाटील यांच्या कुटुंबियांना भेटून करणार सांत्वन” date=”28/10/2020,8:08AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शरद पवार आज नाशिकमध्ये, स्वर्गीय विनायक दादा पाटील यांच्या कुटुंबियांना भेटून करणार सांत्वन, जिल्ह्यातील कांदा व्यापारी पवारांची भेट घेण्याची शक्यता, कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”सातव्या वेतन आयोगासाठी नागपूर महापालिकेतील कर्मचारी आक्रमक” date=”28/10/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सातव्या वेतन आयोगासाठी नागपूर महापालिकेतील कर्मचारी आक्रमक, महापालिका कर्मचारी आज सामूहिक रजेवर, अत्यावश्यक कामे वगळता इतर 4 हजार कर्मचारी रजेवर, कोव्हिडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना भरपाई देण्याची मागणी, रजा घेऊन कर्मचारी होणार होम क्वॉरंटाईन, कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेमुळे महापालिकेच्या कामावर होणार परिणाम [/svt-event]
[svt-event title=”नांदेडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून दोन दिवस काम बंद आंदोलन” date=”28/10/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] नांदेड: महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून दोन दिवस काम बंद आंदोलन, तर त्यानंतर सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे महसुलचे काम पाच दिवस राहणार ठप्प, मात्र या आंदोलनात तलाठी संघटना सहभागी होणार नाही, तलाठी मंडळी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणार पूर्ण, तलाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद आयुब यांनी केले जाहीर,आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तलाठी संघटनेच्या या निर्णयाचा होणार फायदा [/svt-event]
[svt-event title=”नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे” date=”28/10/2020,7:59AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे, तर डॉ. संजय दुधे तायवाडे महाविद्यालयाचे प्राध्यापक, परिक्षांचे वेळेवर निकाल लावणे दुधेंसमोर मोठं आव्हान, बऱ्याच दिवसांनी विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ प्र कुलगुरु, डॉ. संजय दुधे शिक्षक मंचाचे सक्रिय कार्यकर्ते [/svt-event]
[svt-event title=”वसई-विरार-नालासोपाऱ्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण घटले” date=”28/10/2020,7:54AM” class=”svt-cd-green” ] वसई : गेल्या 24 तासांत फक्त 89 कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, 02 कोरोना बधितांचा मृत्यू, तर 82 जणांची कोरोनावर मात, वसई-विरार-नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 26,290 [/svt-event]
[svt-event title=”वीज पुरवठा ठप्प होण्यावरुन नेमलेल्या चौकशी समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ ” date=”28/10/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरुन राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीला अहवाल सादर करण्यास 5 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ [/svt-event]
[svt-event title=”आरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक” date=”28/10/2020,7:45AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : आरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, औरंगाबाद पैठण रोडवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ, औरंगाबाद पैठण रोडवर टायर पेटवून अडवला रस्ता, सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, अशोक चव्हाण यांच्याही विरोधात केली घोषणाबाजी [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात 330 नवीन कोरोना रुग्णांची नोंद” date=”28/10/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात आज 330 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 530 जणांची कोरोनावर मात, एकूण रुग्ण संख्या 94,233, एकूण बरं होणाऱ्यांची संख्या 86,293, तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 3,085 जणांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात कोरोनाच्या लसीसाठी डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया सुरु” date=”28/10/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोनाच्या लसीसाठी डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया सुरु, मनपा आयुक्तांचं नागपुरातील रुग्णालयांना पत्र, रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची मागवली माहिती, केंद्र आणि राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार प्रक्रिया, शहरातील सर्व नोंदणीकृत रुग्णालयांना माहिती पाठवणं अनिवार्य [/svt-event]
[svt-event title=” नागपूरात 219 दिवसांनी ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत ” date=”28/10/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : 30 टक्के क्षमतेने ‘आपली बस’ प्रवासी सेवेत, नागपूर शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा, कोरोनामुळे तब्बल 219 दिवस बंद होती बस सेवा, आजपासून पाच मार्गावर 40 बसेस सुरु, बुटीबोरी, खापरखेडा, हिंगणा मार्गावर सर्वाधिक बसेस [/svt-event]