जगातील 5 माथेफिरु सीरिअरल किलर, एकावर 200 हत्यांचा आरोप

जगात असे अनेक सीरिअल किलर झाले आहेत ज्यांनी सामान्य लोकांच्या मनातच नाही तर पोलीस आणि प्रशासनालाही हादरवून सोडलं.

जगातील 5 माथेफिरु सीरिअरल किलर, एकावर 200 हत्यांचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 4:29 PM

मुंबई : जगात जसे चांगले लोक आहेत तसेच वाईट लोकही आहेत (Top 5 Worlds Most Dangerous Serial Killer). यापैकी काहींची मानसिकता इतकी विकृत असते की ते कुणाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. आजपर्यंत जगात असे अनेक सीरिअल किलर झाले आहेत ज्यांनी सामान्य लोकांच्या मनातच नाही तर पोलीस आणि प्रशासनालाही हादरवून सोडलं. अशाच सर्वात 5 विकृत आणि कुख्यात सीरिअल किलरबाबत आपण आज जाणून घेणार आहोत (Top 5 Worlds Most Dangerous Serial Killer).

जॅक द रिपर

ब्रिटनच्या लंडनमध्ये 1800 साली जॅक द रिपर नावाच्या गुन्हेगाराने शहरात दहशत माजवली होती. मात्र, अद्यापही या आरोपीचं खरं नाव जगासमोर उघड झालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅक फक्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची हत्या करत होता. तो महिलांचा गळा कापायचा आणि शरिरातील आतले अंगही काढून घ्यायचा. हत्या करण्याची पद्धत आणि मानवी अंग काढण्यामुळे त्याला हे विचित्र नाव देण्यात आलं होतं. तो इतका कुख्यात होता की त्याच्या नावावर अनेक व्हिडीओ गेम्सही तयार करण्यात आले होते.

जेफ्री डामर

जेफ्री डामर हाही एक कुख्यात सीरिअल कीलर होता. तो अमेरिकेच्या मिलवॉकी हत्याकांडमधील मुख्य आरोपी होता. तो बलात्कार केल्यानंतर त्या व्यक्तीची हत्या करायचा. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करायचा. त्याने 17 पुरुषांना अशा पद्धतीने मारलं. हत्या केल्यानंतर तो शरीराचे तुकडे करुन ते खायचा. जेफ्रीच्या अटकेनंतर त्याला अनेक प्रकारचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं समोर आलं. 1990 मध्ये न्यायालयाने त्याला 900 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, तुरुगांत एका गुन्हेगाराने त्याची हत्या केली (Top 5 Worlds Most Dangerous Serial Killer).

टेड बंडी

1970 मध्ये अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये महिलांचा बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यासाठी सीरिअल कीलर टेड बंडी कुख्यात होता. त्याने 36 महिलांची एकाच पद्धतीने हत्या केली होती. त्याने आणखी काही महिलांना टार्गेट केलं होतं. या घातक माथेफिरुला शिक्षा सुनावण्याच्या सुनावणीचं न्यायालयाने टीव्हीवर प्रसारणंही केलं होतं. न्यायालयाने या गुन्हेगाराला इलेक्ट्रिक खुर्चीवर बांधून मारण्याची शिक्षा सुनावली होती.

चार्ल्स मेन्शन

एका वेगळ्या पद्धतीचा धार्मिक पंथ चालवणारा सीरिअल कीलर चार्ल्स हा 1960 च्या दशकात विकृत आणि भीतीदायक पद्धतीने हत्या करण्यासाठी कुख्यात होता. त्याच्या पंथात सहभागी होणाऱ्या लोकांना त्याने मेन्शन फॅमिलीचं नाव दिलं होतं. हे लोक बायबलच्या काही भागांचा चुकीचा अर्थ काढून लोकांना गुन्हा करण्यासाठी प्रेरित करत होते. त्याने हत्या केलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शेरोन टेट, दिग्दर्शक रोमन पोलांस्की यांच्या गर्भवती पत्नीचाही समावेश होता. चार्ल्सच्या अनुयायांनीच त्याची चाकूने वार करून हत्या केली होती. चार्ल्स मेन्शनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेरोल्ड शिपमेन

200 पेक्षा अधिक हत्यांचा आरोपी हेरोल्ड शिपमेन हा व्यवसायाने डॉक्टर होता. तो त्याच्या रुग्णांचा अशा पद्धतीने खून करायचा की कुणाला त्यावर संशयही येत नसे. रुग्णाची हत्या केल्यानंतर तो कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी मृतदेत सोपवत होता. अनेक वर्षांपर्यंत हे सुरु होतं. मात्र, एकदा शिपमेनने अनेक मृत्यूच्या दाखल्यांवर स्वाक्षरी केल्याचं एका व्यक्तीच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याची चौकशी झाली. त्यामध्ये त्याने तब्बल 200 जणांची हत्या केल्याचं पुढे आलं. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, त्याने तुरुंगातच आत्महत्या केली.

Top 5 Worlds Most Dangerous Serial Killer

संबंधित बातम्या :

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

कारचालकाच्या कृत्याचा कहर, वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.