महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ

| Updated on: May 01, 2020 | 10:45 PM

महाराष्ट्रात आज (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात आज (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आत्तापर्यंत राज्यभरात एकूण 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या. त्यापैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, 11 हजार 506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 11 हजार 677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 26 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 485 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी पुणे शहरातील 10, मुंबईचे 5, जळगाव जिल्ह्यातील 3 तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्गमधील 1, भिवंडी महानगरपालिकेतील 1, ठाणे मनपामधील 1, नांदेडमधील 1,औरंगाबाद मनपामधील 1 आणि 1 मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय मुंबईमध्ये उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 18 पुरुष, तर 8 महिला आहेत. आजच्या 26 मृत्यूंपैकी 14 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील आहेत, 11 रुग्ण वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. एक जण 40 वर्षांखालील आहे. या 26 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (58 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 10 हजार 849 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 45.34 लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळणार? गृहमंत्र्यांकडून नियमावली जाहीर

पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात

मुंबई-पुण्यात अडकलेल्यांना गावी जाण्याची व्यवस्था होणार का? राजेश टोपे म्हणतात…

Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

Total Corona Patient in Maharashtra