राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 635 वर, 52 जण उपचारानंतर बरे, 10 लाख नागरिकांचं सर्वेक्षण : राजेश टोपे

राज्यात आज (4 एप्रिल) 145 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 635 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 635 वर, 52 जण उपचारानंतर बरे, 10 लाख नागरिकांचं सर्वेक्षण : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 11:52 PM

मुंबई : राज्यात आज (4 एप्रिल) 145 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 635 वर पोहचली आहे. आतापर्यंत 52 कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेऊन बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra). आजच्या राज्यस्तरीय अहवालात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना अहवालांचा समावेश करण्यात आला आहे.

आज दिवसभरात राज्यात एकूण 6 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृत्यूपैकी 1 रुग्ण मुंब्रा (ठाणे) येथील, 1 रुग्ण अमरावती येथील आणि उर्वरित 4 रुग्ण मुंबई येथील आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना बाधित रुग्णांचा तपशील :

  • मुंबई – 377
  • पुणे (शहर व ग्रामीण) – 82
  • सांगली – 25
  • ठाणे मंडळ – 77
  • नागपूर – 17
  • अहमदनगर – 17
  • यवतमाळ – 4
  • लातूर – 8
  • बुलडाणा – 5
  • सातारा – 3
  • औरंगाबाद – 3
  • उस्मानाबाद – 3
  • कोल्हापूर – 2
  • रत्नागिरी – 2
  • जळगाव – 2
  • सिंधुदुर्ग – 1
  • गोंदिया – 1
  • नाशिक – 1
  • वाशीम – 1
  • अमरावती – 1
  • हिंगोली – 1
  • इतर राज्य  (गुजरात) – 1
  • एका रुग्णाच्या पत्त्याची खातरजमा करण्याचं काम सुरु आहे.

राज्यात आज एकूण 708 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 हजार 503 नमुन्यांपैकी 13 हजार 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर 635 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42 हजार 713  व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत. 2913 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त 1225 व्यक्तींच्या यादीपैकी 1033 व्यक्तींशी संपर्क झाला आहे. त्यापैकी 738 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 7 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत, तर एक जण हिंगोलीतील आहे.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 523 टीम काम करत आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 423 टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये 210 टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात 196 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण 2849 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

आजच्या मृत्यू झालेल्या 6 रुग्णांचे तपशील –

  1. मुंब्रा येथील इलेक्ट्रिशियन असणाऱ्या 57 वर्षीय पुरुषाचा सकाळी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते.
  2. मुंबईच्या नायर रुग्णालयात शुक्रवारी (3 एप्रिल) संध्याकाळी एका 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला फुप्फुसाचा आजार आणि हृदयविकार होता. मधुमेह असणाऱ्या या महिलेला हायपोथायरॉडिझम हा आजारही होता.
  3. मुंबईच्या के ई एम रुग्णालयात निवृत्त बेस्ट वाहनचालक असणाऱ्या 67 वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी(3 एप्रिल) सकाळी मृत्यू झाला. त्यांना 10 वर्षांपासून मधुमेह होता.
  4. मुंबईच्या के ई एम रुग्णालयात 53 वर्षीय पुरुषाचा  शुक्रवारी (3 एप्रिल) पहाटे मृत्यू झाला. निवृत्त मिल कामगार असणाऱ्या या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नव्हता.
  5. मुंबईच्या के ई एम रुग्णालयात 70 वर्षीय पुरुषाचा 3 एप्रिल रोजी संध्याकाळी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
  6. अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात एका 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. व्यवसायाने मेकॅनिक असणाऱ्या या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होता. त्याने कोठेही प्रवास केल्याची नोंद नाही.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 32 झाली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात 54 जणांना कोरोनांचा संसर्ग, मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची शोधाशोध सुरुच

तब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

स्वत:ची काळजी घ्या, सरकार तुमच्या पाठीशी, अनिल देशमुखांचं पोलिसांना आवाहन

‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’, सुरेश धस यांची घोषणा

पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल

Total Corona Patient in Maharashtra

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.