नाशिकमध्ये आणखी 52 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 1053 वर

जिल्ह्यात आज (27 मे) दिवसभरात 52 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1053 इतकी झाली आहे (Total Corona Patient in Nashik).

नाशिकमध्ये आणखी 52 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 1053 वर
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 9:11 PM

नाशिक : जिल्ह्यात आज (27 मे) दिवसभरात 52 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1053 इतकी झाली आहे (Total Corona Patient in Nashik). यात मालेगावमध्ये 716, नाशिक शहरात 122, नाशिक ग्रामीण भागात 152 तर अन्य 63 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील 8, मालेगावमधील 46, नाशिक ग्रामीणमधील 3 आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 735 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मालेगावमधील 561, नाशिक शहरातील 42, नाशिक ग्रामीणमधील 95, तर जिल्ह्याबाहेरील 37 जणांनी कोरोना विरुद्ध यशस्वी लढाई केली. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकमध्ये केवळ 243 कोरोना सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यात मालेगाव 155, नाशिक शहर 80, नाशिक ग्रामीण 57 आणि जिल्ह्याबाहेरील 26 रुग्ण आहेत.

आज दिवसभरात नाशिकमध्ये आणखी 6 पोलीस कोरोनाबाधित झाले. एकट्या मालेगावमध्ये 200 हून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. असं असलं तरी सध्या केवळ 16 पोलीस कोरोना सक्रीय असून उर्वरित पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील 163 पोलिसांचा समावेश आहे, तर उर्वरित पोलीस परजिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत नाशिकमध्ये 3 कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज राज्यात 2190 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 56 हजार 948 इतकी झाली आहे. आज नवीन 964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 17 हजार 918 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात एकूण 37 हजार 125 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात

Live Update : राज्यात दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार

गडचिरोलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, मुंबई-पुण्यातून आलेल्या 26 जणांना लागण

संबंधित व्हिडीओ :

Total Corona Patient in Nashik

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.