सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, राज्यातील रुग्णांची संख्या 98 वर
सांगली 4, मुंबईत 3 आणि साताऱ्यात 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. यासह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 97 वर पोहचली आहे (Total Corona patient in Maharashtra).
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सांगलीत एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. या व्यतिरिक्त मुंबई, कल्याण, ठाण्यात प्रत्येकी एक आणि साताऱ्यात 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 98 वर पोहचली आहे (Total Corona patient in Maharashtra).
संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल आज आले असून ते चौघेही कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 40 पुणे – 16 पिंपरी चिंचवड – 12 कल्याण – 5 सांगली – 4 नागपूर – 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 सातारा – 2 ठाणे -2 पनवेल – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1
एकूण 98
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च
एकूण – 98 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिकाचा मृत्यू (1) – 23 मार्च एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
संबंधित बातम्या :
मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप
कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा
जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
Total Corona patient in Maharashtra