मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम
रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत. विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या […]
रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत.
विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या मित्र परिवारासोबत थेट गोवा आणि कोकण गाठत आहे. मात्र येथे त्यांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी ट्रॅफिक जामची कसरत करत कसे बसे कोकणात पोहचत आहेत. तब्बल 15 ते 16 तासांचा प्रवासकरून पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. सध्या मुंबई गोवा महामार्गावर कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या दिसत आहे.
पेण वडखळ जवळ दीड ते दोन तासांच्या ट्रॅफिक जामनं पर्यटक हैराण झाले आहेत. या ट्रॅफिक जाममुळे मुंबईतून रत्नागिरी येण्यासाठी तब्बल 15 तासांचा प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे अधिकचा वेळ लागतोय. तर रत्नागिरीतून गोवा आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे.
अशीच परिस्थिती मुंबई-पुणे मार्गावरही दिसत आहे. विकेंड म्हटलं की मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या धावपळीच्या दुनियेतून आराम मिळवण्यासाठी मुंबई बाहेर जातो. पण तेथेही ट्रॅफिक जाममुळे चांगलीच पंचायत झालेली दिसत आहे.