पुणे-बंगळुरु महामार्गावर पंचगंगेच्या पुराचं पाणी, खात्री करुनच गाडी चालवा

पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलंय. त्यामुळे ही लेन बंद करण्यात आली आहे. तर पूर्वेकडील बाजूने एकाच लेनद्वारे कागल, कोल्हापूरहून पुण्याकडे, तर पुण्याहून बेळगावकडे दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर पंचगंगेच्या पुराचं पाणी, खात्री करुनच गाडी चालवा
Follow us
| Updated on: Aug 05, 2019 | 11:01 PM

पुणे : नद्यांना आलेलं पाणी राष्ट्रीय महामार्गावरही आलंय. यामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. तर तिकडे कोल्हापुरातही पंचगंगेचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आलंय.

पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलंय. त्यामुळे ही लेन बंद करण्यात आली आहे. तर पूर्वेकडील बाजूने एकाच लेनद्वारे कागल, कोल्हापूरहून पुण्याकडे, तर पुण्याहून बेळगावकडे दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

रात्री पाण्याची पातळी वाढल्यास पुणे, सातारा आणि बेळगाव या ठिकाणीच अवजड वाहतूक थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास महामार्गाच्या दोन्ही लेन बंद करण्यात येतील, अशीही माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

हायवेवरील वाहन चालकांना हायवेचा रस्ता सोडून धाबे, हॉटेल अशा सुरक्षित ठिकाणी पार्किंग करुन थांबण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. तसेच, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर क्रमांक 4 वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रात्री आणि उद्या दिवसा हायवे सुरु झाल्याची खात्री केल्याशिवाय प्रवासाची सुरुवात करु नये, असं  आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलंय.

माळशेज घाटही वाहतुकीसाठी बंद

पाऊस सुरु असल्याने माळशेज घाटातही दरड आणि झाडे कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कुणीही या मार्गाने जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.

पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता बंद

आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे दरड पडली असल्याने पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाची वाहतूक बंद झाली आहे. पोलादपूर येथे शिवाजी चौक येथे बॅरिकेट लावून वाहतूक बंद करण्यात आली. महाबळेश्वर हद्दीमध्ये देखील रस्ता खचला आहे. झाडे रस्त्यावर पडली आहेत. त्या मार्गे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जोपर्यंत महाबळेश्वरकडून पोलादपूरकडे येणारी वाहतूक चालू केली जात नाही, तोपर्यंत पोलादपूर ते महाबळेश्वर वाहतूक सुरु करू नये, असं महाबळेश्वर पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

बेळगाव कोल्हापूर वाहतूक बंद जिल्ह्यात हायअलर्ट

सततच्या पावसाचा फटका बसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे-बंगळूरू महामार्गावर तवंदी घाटातील दरड कोसळली. दरड कोसळल्याने बेळगाव ते कोल्हापुर वाहतूक बंद झाली आहे. निपाणीजवळ महामार्ग रोखण्यात आलं आहे. त्यामुळे कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे, त्याशिवाय येथे वाहतूक रोखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील धरणे पूर्णपणे भरले आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्व नद्यांना आपल्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर्ण बेळगाव जिल्ह्यातलं हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच बचावकार्यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.