कुठं दहशतवादी, तर कुठं जीवघेण्या आजारांपासून जीवाला धोका, जगातील ‘या’ देशांमध्ये प्रवास करणं टाळा
जर तुम्ही पुढील वर्षी बिजनेस ट्रॅव्हलसाठी (Business Travel) किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
न्यू यॉर्क : जर तुम्ही पुढील वर्षी बिजनेस ट्रॅव्हलसाठी (Business Travel) किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील असे काही देश आहे जेथे एक तर दहशतवाद्यांपासून किंवा जीवघेण्या आजारांपासून जीवाला धोका आहे. यात लिबिया, सीरिया, अफगानिस्तान (Afghanistan) सारख्या अनेक देशांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या जीवाची पर्वा करणाऱ्यांना या यादीतील देश आपल्या यादीतून काढून टाकावे लागतील. या देशांना सुरक्षा तज्ज्ञांनी (Security Experts) 2021 मधील सर्वात धोकादायक देशांच्या यादीत टाकलं आहे (Travel Risk Map List of most dangerous countries of the world).
आंतरराष्ट्रीय एसओएसच्या जागतिक सुरक्षा तज्ज्ञांनी ‘ट्रॅव्हल रिस्क मॅप’ तयार केला आहे. ही संस्था वेगवेगळ्या निकषांवर संबंधित देशांमधील सुरक्षेचं मुल्यांकन करते. जगातील सर्वात धोकादायक देशांच्या यादीचं नाव ‘एक्सट्रीम रिस्क’ आहे. या वर्गात जगातील 14 देशांचा समावेश आहे. यात अफगानिस्तान, यमन, सीरिया, लिबिया, माली, सोमालिया, दक्षिण सूडान, सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिक, नायजेरिया, डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, यूक्रेन, पाकिस्तान, इराक आणि मिस्रच्या काही भागाचा समावेश आहे.
या अहवालात अतिधोक्याच्या यादीतील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या नियंत्रणाबाहेरची स्थिती आणि कायद्याचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या देशांमध्ये सशस्त्र टोळ्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालातील ‘लो रिस्क’ वर्गात अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपीयन देशांचा समावेश आहे. स्कँडिनेवियाई देश सर्वात कमी जोखीम असणाऱ्या सुरक्षित देशांमध्ये टॉपला आहेत.
वैद्यकीय सुरक्षेच्या निकषावर देखील देशांचं मुल्यांकन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीआधी सर्वात धोकादायक वर्गात वेनेझुएला, नायजर, लिबिया, सोमालिया, दक्षिण सूडान, इरिट्रिया, यमन, बुर्किना फासो, गिनी, सीरिया, अफगानिस्तान आणि इराक या देशांचा समावेश आहे. दुसरीकडे सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत यूके, पश्चिमी यूरोप, यूएम, कॅनडा आणि दक्षिण अफ्रीका यांचा समावेश आहे.
या वर्गावारीतील देशांचं रेटिंग वेगवेगळ्या निकषांवर करण्यात आलं आहे. यात संसर्गजन्य रोगांपासून तर अगदी पर्यावरण आणि आपत्कालीन सुविधा यांसारख्या अनेक निकषांचा समावेश आहे. कोरोनानंतर मेडिकल सेफ्टीच्या आधारावर व्यावसायिक निर्बंधांमुळे केवळ 4 देशांनाच ‘लो रिस्क’ रेटिंग मिळालं आहे. यात तंजानिया, न्यूझीलंड, निकारागुआ आणि स्वालबार्ड या देशांचा समावेश आहे.
दुसरीकडे ‘मध्यम’ जोखीम असलेल्या देशांच्या यादीत यूएस, ब्राझील आणि भारताचा समावेश आहे. ‘सर्वात धोकादायक’ श्रेणीत रशिया आणि अफगानिस्तानला ठेवण्यात आलं आहे. केवळ जॉर्जियाला ‘अतीधोक्याच्या’ यादीत ठेवण्यात आलंय.
हेही वाचा :
पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई
Jammu and Kashmir | पुलवाम्यात दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी
ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल
Travel Risk Map List of most dangerous countries of the world