442 रुपयांची केळी घेण्याऐवजी फिरायला चला, पश्चिम रेल्वेची हटके जाहिरात
काही दिवासंपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये राहुल बोसने (Rahul Bose) सांगितले की, त्याला पंजाबमधील एका नामांकीत हॉटेलमध्ये 442 रुपयाला दोन केळी देण्यात आल्या आहेत.
मुंबई : काही दिवासंपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये राहुल बोसने (Rahul Bose) सांगितले की, त्याला पंजाबमधील एका नामांकीत हॉटेलमध्ये 442 रुपयाला दोन केळी देण्यात आल्या आहेत. 442 रुपयाला दोन केळी मिळत असल्याने हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक हटके जाहिरात केली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेकडून (Western railway) प्रवाशांसाठी खास ऑफर सुरु केली आहे. 442 रुपयात दोन केळी घेण्यापेक्षा 3 रुपये अधिक भरुन 445 रुपयात एतिहासीक ठिकाणी फिरायला चला तेही रेल्वेच्या स्लीपर कोचमधून, असं रेल्वेने जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.
Western Railway can take you at many tourist spots around the western zone of India. Travel easy with WR at an affordable price (approx. fare for Sleeper class). #RahulBoseMoment #WRKiSawari pic.twitter.com/El6iap7vpN
— Western Railway (@WesternRly) July 26, 2019
पश्चिम रेल्वेने राहुल बोस यांच्या व्हिडीओनंतर आज (26 जुलै) ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेने 445 रुपयात प्रवाशांना एतिहासीक जागेची सफर देण्यात येईल, असं म्हटलं आहे. पश्चिम रेल्वे तर्फे 445 रुपयात प्रवासी राजस्थानच्या चित्तौरगड या एतिहासीक ठिकाणी भेट देऊ शकतो. तसेच पश्चिम भारतातील इतर एतिहासीक ठिकाणीही तुम्ही 445 रुपयात रेल्वेने फिरायला जाऊ शकता, असंही त्या जाहिरातीत रेल्वेने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता राहुल बोस सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगनिमित्त पंजाबमधील चंदीगडमध्ये आहे. शूटिंग सुरु असल्याने राहुल बोस चंदीगडमधील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी राहुलने हॉटेलमध्ये दोन केळींची ऑर्डर दिली. मात्र या केळींचं बिल पाहून त्याला धक्काच बसला. हॉटेलने दोन केळींपोटी तब्बल 442 रुपयांचं बिल राहुलच्या रुममध्ये पाठवलं.
You have to see this to believe it. Who said fruit wasn’t harmful to your existence? Ask the wonderful folks at @JWMarriottChd #goingbananas #howtogetfitandgobroke #potassiumforkings pic.twitter.com/SNJvecHvZB
— Rahul Bose (@RahulBose1) July 22, 2019
दोन केळायांचे बिल 442 रुपये पाहून राहुलने थेट व्हिडीओ रेकॉर्ड करत नाराजी व्यक्त केली आहे. या बद्दलचा व्हिडीओही त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओखाली अनेक कमेंट येत आहेत. कोणी म्हणतो यातील जीएसटीच्या रकमेत अनेक डझन केळी आली असती, तर कोणी म्हणतं जर तू मँगो शेक वगैरे मागवला असतास तर त्याची किंमत आयफोन इतकी असती.