आदिवासी भागात झाडांच्या पानांचे मास्क, कोरोना रोखण्यासाठी खबरदारी

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढल्याने सर्वत्र खबरदारी घेतली ( tribals using tree leaf mask) जात आहे. संसर्ग वाढू नये म्हणून देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे.

आदिवासी भागात झाडांच्या पानांचे मास्क, कोरोना रोखण्यासाठी खबरदारी
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 5:28 PM

रायपूर (छत्तीसगड) : देशभरात कोरोनाचा फैलाव वाढल्याने सर्वत्र खबरदारी घेतली ( tribals using tree leaf mask) जात आहे. संसर्ग वाढू नये म्हणून देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे सध्या जो तो मास्क बांधलेला दिसतो. मात्र तिकडे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागात वेगळंच चित्र दिसून आलं.

आदिवासी नागरिकांकडे आरोग्य सुविधा पोहोचल्याच नसल्याने, इथल्या नागरिकांना चक्क झाडांच्या पानांचे मास्क बनवून वापर करावा लागत आहे. नाका-तोंडाला झाडांची पाने बांधून, हे नागरिक संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.

छत्तीसगडमधील अबुझमाड हा घनदाट जंगल परिसर आहे. या जंगलाला माओवांद्यांची राजधानी असंही संबोधलं जातं. इथ अनेक आदिवसाी राहतात. मात्र या आदिवासी नागरिकांपर्यत प्रशासनाच्या सुविधा पोहोचत नाहीत.

या नागरिकांपर्यंत कोरोना व्हायरसची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:हून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. हा अतिसंवेदलशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्याने, इथे कुणी मास्क वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा परिसरातील भर्रीटोला गावात, लोकांनी झाडांच्या पानांपासून मास्क बनवून ते वापरण्यास सुरुवात केली.

इथल्या गावात सभा आयोजित करुन कोरोनाविषयी माहिती देत आहेत. कोरोनामुळे मास्कचा तुटवटा असला तरी आदिवासी समाजाने पानांपासून तयार केलेल्या मास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुर्गम भागातील नागरिक कोरोनाबाबत खबरदारी घेत असताना, इकडे शहरातील नागरिकांना मात्र त्याबाबत गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. कारण लॉकडाऊन असून अनेकजण रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना श्रम आणि वेळ वाया घालवावं लागत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.