आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा झाला (tripura purnima celebrated in raigad).
कोरोनाचे संकट असल्याने मंदिरांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी झाली नसली तरिदेखील सुरक्षितता पाळत अनेक भक्तांनी मंदिरांमध्ये जाऊन त्रिपुरी पौर्णिमा साजारी केली.
Follow us
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील त्रिपुरी पैर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र साजरी होते. हा उत्सव विशेष करून शिवमंदिरांमध्ये साजरा होतो.
आजच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.
आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा झाला.
महाडमधील विरेश्वर मंदिर, अलिबाग चौल येथील श्री रामेश्वर मंदिर, रोहा येथील धावीर मंदिरासह जिल्ह्यातील इतर मंदिरात देखील हा उत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिर परीसर पारंपरिक पणत्यांसह विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.
कोरोनाचे संकट असल्याने मंदिरांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी झाली नसली तरिदेखील सुरक्षितता पाळत अनेक भक्तांनी मंदिरांमध्ये जाऊन त्रिपुरी पौर्णिमा साजारी केली.