नागपूरमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी, तुकाराम मुंढे स्वतः रस्त्यावर

शहराला कोरोनापासून वाचवण्यासाठी नागपूरात लॉकडाऊन करण्यात आला (Tukaram Mundhe on Nagpur Lock Down). यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही चांगलीच कंबर कसली.

नागपूरमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी, तुकाराम मुंढे स्वतः रस्त्यावर
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 12:01 AM

नागपूर : शहराला कोरोनापासून वाचवण्यासाठी नागपूरात लॉकडाऊन करण्यात आला (Tukaram Mundhe on Nagpur Lock Down). यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही चांगलीच कंबर कसली. त्यामुळे लॉकडाऊनची चोख अंमलबजावणी झाल्याचं नागपूर शहरात पाहायला मिळालं.

लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागपूरमध्ये सकाळपासूनच दुकानं बंद असल्याचं पाहायला मिळालं. मात्र काही नागरिक रस्त्यावर दिसत होते. त्यात काही कामानिमित्त निघालेले, तर काही सुट्टी आहे म्हणून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. सीताबर्डीची बाजारपेठही सकाळी पूर्णतः बंद होती.

महाल, इतवारी धरमपेठ मधील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडता इतर दुकानं बंद होती. सकाळी 10 वाजताच्या सुमारास  महानगर पालिका आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊन आणि बंदच्या स्थितीची पाहणी करत रस्त्यावरुन पाहणी केली. त्यांनी बर्डी मार्केटमध्ये सुरु असलेली काही दुकानंही बंद केली. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या नागरिकांना घरी जाण्याचा आवाहन केलं. यानंतर त्यांचा मोर्चा महालमधील बाजारात पोहचला. तेथे पूर्ण बंद पाहायला मिळाला. मात्र काही नागरिक रस्त्यावर दिसली. त्यांनाही मुंढे यांनी रस्त्यावर उतरुन घरी जाण्याच्या सुचना दिल्या.

मोमीनपूर भाग मुस्लिम बहुल भाग आहे. येथील बाजार नेहमी सुरु असतो. मात्र, आज सगळी दुकानं बंद पाहायला मिळाली. मात्र दुःखाची बाब म्हणजे नागरिक याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होती. नागरिकांसाठी सगळे निर्णय घेतले जात असले तरी जनता प्रतिसाद देत नाही यावर  मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी नागरिकांना घरातच बसण्याची विनंती केली. यानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत नागपूरच्या जनतेला आपलं हित म्हणून घराबाहेर पडू नका, नाही तर तुम्हाला जबरदस्तीने घरात ठेवावं लागेल असा इशारा दिला.

जनतेने नियमांचं पालन करावं यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून पोलीस गल्लीगल्लीत जाऊन जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत होते. नागरिकांना घरी पाठवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदीही केली. कशाप्रकारे पोलिसांनी आपली भूमिका बजावली याचा आढावा पोलीस आयुक्तांनी घेतला.

Tukaram Mundhe on Nagpur Lock Down

HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.