BLOG : एकनाथ खडसे : ना स्वस्थ बसणार, ना बसू देणार

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रात बहुजनांचा नेता म्हणून ओळख आहे (BJP leader Eknath Khadse).

BLOG : एकनाथ खडसे : ना स्वस्थ बसणार, ना बसू देणार
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 2:01 PM

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रात बहुजनांचा नेता म्हणून ओळख आहे (BJP leader Eknath Khadse). मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे एकनाथ खडसे यांना भाजप पक्षातून डावलले. तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांना भाजपमध्ये देण्यात येत आहे, ज्या कार्यकर्त्यांना एकनाथ खडसे यांनी घडवलं, तेच कार्यकर्ते एकनाथ खडसे यांना चोरावर मोर झाल्याचे चित्र निर्माण झाले (BJP leader Eknath Khadse).

उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे पक्ष बदल करणार असल्याच्या महाराष्ट्रात वावड्या उठत आहेत. मात्र या काही प्रमाणात सत्य असल्याचेही खडसेंच्या चाहत्यांमध्ये बोलले जात आहे. कारण खडसे हे स्वस्थ बसणारे नेते नाहीत आणि स्वस्थ बसू देणारे नेते नाहीत.

चाळीस वर्षाचा दीर्घकाळ अनुभव सहजासहजी प्रस्थापित होत नाही. एकंदरीत जळगाव जिल्ह्यात भाजपाचा खुटा ही नव्हता अशावेळेस मुक्ताईनगरच्या कोथळी गावातून त्यांनी सुरुवात केली आणि बाकीच्यांची खुटे त्यांनी उपठून फेकले. भाजपाचं कमळ तेंव्हा लोकांना दिसल आणि भाजपाला उत्तर महाराष्ट्र विदर्भात खडसेंच्या रुपात नवा चेहरा मिळाला. तेही आक्रमक नेता म्हणून, खडसे यांचा 2014 मध्ये भाजपाच्या सरकार स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा होता. स्वभाविकच एकनाथ खडसे त्यावेळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे उत्तर महाराष्ट्राला मिळणारा मुख्यमंत्री या कुरघोडीमुळे गमावावा लागला. त्यामुळे वास्तविक 2014 मध्ये मोदीचं वारं होतं, पण वाऱ्याचे वादळ करणारेही खडसे सारखेच कार्यकर्ते होते म्हणून महाराष्ट्रात भाजपाला सत्ता स्थापन करण्यात आली होती. कदाचित मुलगा झाला की बारशाला घुगऱ्या खायला सगळेच जमतात अशी गत निर्माण होऊन खडसेंना डावलण्यात आलं का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडसेंना 2014 पासून नाराज केले. त्याचे परिणाम देखील भाजपाला भोगावे लागले, सत्ता गेली आणि हातात धुपाटनं. एकनाथ खडसे कदाचित हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधतील. त्यांनी घड्याळ बांधले तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात भाजप हे भूईसपाट होणार हे मात्र निश्चित, असा जाणकारांचा कयास आहे. कारण एकनाथ खडसे यांची भाजपमधील आमदारांची फळी ही खडसेंसोबत आहे. आमदारसोबत दिसत नसले तरीही ज्यावेळेस खडसे पक्ष स्थलांतरीत करतील त्यावेळेस भाजपाला खडसे मात्र मोठा हादरा देतील हे निश्चित आहे. ते म्हणतात ना शेतात पेरलेलं धन राबवलेला आणि पेरलेलं कामात पडतेचं हे शतपट सत्य आहे. मात्र हे पाहणं महत्त्वाचं की या काही कार्यकर्त्यांना शेंबूड पुसता येत नव्हते असे कार्यकर्ते खडसे यांनी घडवले. ते आज पांढऱ्या बगळ्यासारखे दिसत आहेत, हे सर्व अशा वेळेस खडसेंना साथ देतील का? खडसेंसोबत हे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खडसे हे कदाचित ईतर पक्षात गेले तर पंचवार्षिक निवडणुकीत खडसे यांच्या विरोधात रणनीती आखतील असाही कयास ग्रामीण भागातून वर्तविला जात आहे. खडसे यांनी घडवलेले काही कार्यकर्ते तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत. त्यांना कदाचित खडसेंच्या नाराजीचा पुळका का आला नाही?

महाराष्ट्रातील विरोधक म्हणतात खडसे यांच्यावर भााजापाने अन्याय केला. खडसे यांनी घडवलेल्या कार्यकर्त्याला कधीच असं वाटलं नाही का? पण इथे पण स्वार्थ आला का? पुढे मात्र खडसे यांना मानणारा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे ही वस्तुस्थिती, पक्षश्रेष्ठीला याचा विसर पडल्याचे दिसत आहे मात्र आता पक्षातील कुरघोडी मुळे कमळ सुखल्यासारखं झाल आहे.

खडसे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात करत असतात. पक्षश्रेष्ठीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची लोकप्रियता तपासावी. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट किंवा एखादी लाईव्ह चाट तपासा, कुणाची लोकप्रियता महाराष्ट्रात कोणाची घसरली ते दिसेल.

खडसे म्हणतात, सत्य एक दिवस बाहेर येईल आणि मला न्याय मिळेल. खडसे हे कधी पक्ष स्थलांतराचा निर्णय घेतील का? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह ग्रामीण भागातील त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

खडसे यांनी कदाचित हातात घड्याळ बांधले तर त्यांच्यावर केलेल्या तथा कथित आरोपामुळे त्यांना मनस्ताप झाला होता. खडसे पक्ष स्थलांमध्ये मोठ्या जबाबदारीची वाट ते पाहत आहेत का? त्यांना झालेल्या मनस्तापाचा हिशोब त्यांना देता आला पाहिजे याची तर ते वाट पाहत नसतील ना? कारण त्यांच्या व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपवरून असा कायस जाणकारांनी लावला आहे. त्यांना दाऊद, भोसरीची जमीन अशा कथित आरोपांचे पाढे त्यांना वाचायचे असतील त्याचे कारणही तसे आहे.

खडसेंवर ज्याप्रकारे आरोप झालेत त्यावेळेपासून तर आतापर्यंत ना राष्ट्रवादीने ,शिवसेना, काँग्रेस किंवा इतरत्र पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर अक्षेप घेतलेला नाही. कोणीही उठतो आणि आरोप करतो की इतपत सत्य सर्वात अगोदर त्यांच्या भाजप पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा राजीनामा मागून घेतला. काल कोणी म्हणेल अजून 302 गुन्हा केला त्यांनी केला का?

खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठताच भाजपाला धक्का बसला आहे का एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे घणाघात आरोप करत आहेत. खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार ही चर्चा महाराष्ट्रात सुरु झाल्यानंतर चंद्रकांतदादा यांनी खडसेंच्या प्रवेशाची धस्की घेतली होती का ? असं बोललं जात आहे.

खडसेंच्या पक्ष प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात, खडसे असा कुठला निर्णय घेणार नाही की ज्याने पक्षाला धक्का बसेल. याचा अर्थ एक प्रकारे हे तोंड दाबून बुक्क्याचा मार नाही का? मरु देत नाही आणि जिवंतही राहू देत नाही हे काय? अशी सध्या खडसेंची परिस्थिती आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणतात, डीएनए पक्ष सोडण्यास सांगू शकत नाही. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. मग खडसे यांच्याविषयी कुरघोडीचे राजकारण ? लोक आता तुमच्या या वक्तव्यावर हसायला लागले.

खडसे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दिवशी भाजपाच्या चांगल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, खडसेंच्या रुपात आम्हाला तर महाराष्ट्रात मोठा आणि चांगला नेता मिळाला. तोंड भरून यांच्या तोंडात साखर भरा, अशी परिस्थिती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला होती. या सोहळ्याला अनेकांनी दांड्याही मारल्या होत्या.

खडसे वारंवार म्हणतात मी काय गुन्हा केला. महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलायं.

खडसे सारखा बहुबली नेता उत्तर महाराष्ट्रात मिळाला तर याचा राष्ट्रवादीला खूप मोठा फायदा होईल हे मात्र निश्चित, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

खडसेंना तथाकथित आरोपामुळे ज्याप्रकारे भाजपमध्ये वागणूक मिळाली. त्यावरुन त्यांच्या एक प्रकारे वर्चस्वाच्या लढाई आणि कुरघोडीचे राजकारण झाल्याचं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोलले जात आहे.

टीप – संबंधित मतं लेखकाची व्यक्तिगत मतं आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.