LIVE : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांचे 82 मोबाईल जप्त

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांचे 82 मोबाईल जप्त
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 7:36 PM

[svt-event title=”पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांचे 82 मोबाईल जप्त” date=”13/09/2019,7:34PM” class=”svt-cd-green” ] पुणे- पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद, तब्बल 7 लाख 80 हजाराचे मोबाईल जप्त. 20 जणांना ताब्यात घेऊन तब्बल 82 मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त मोबाईलमध्ये वेगवेगळ्या नामांकित मोबाईलचा समावेश आहे. नदीपात्रात पुलाखाली चार संशयित बसल्याचं पोलिसांना आढळून आलं, या भामट्यांकडे सुरुवातीला अठरा मोबाईल सापडल्याने टोळीचा पर्दाफाश झाला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर मोबाईल चोरल्याचं उघड झालं. ही टोळी मालेगाव आणि नांदेडमधील मोबाईल चोरांची टोळी असल्याचं उघड [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात रामराजेंचा कार्यकर्ता मेळावा” date=”13/09/2019,5:08PM” class=”svt-cd-green” ] सातारा : कार्यकर्ता संवाद मेळाव्याला फलटणमध्ये सुरुवात, असंख्य कार्यकर्ते उपस्थित, रामराजे नाईक निंबाळकरांची उपस्थिती शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव, सामान्य लोकांच्या विकासाकरिता सत्तेसोबत राहण्याची कार्यकर्त्यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ” date=”13/09/2019,3:48PM” class=”svt-cd-green” ] लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरांकडून हात सफाई, शेकडो लोकांच्या सोनेच्या चेन आणि मोबाईल फोन चोरी, तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांची गर्दी, परप्रांतातून चोर आल्याचा संशय [/svt-event]

[svt-event title=”मंत्रीपदप्रकरणी विखे, महातेकर, क्षीरसागरांना दिलासा” date=”13/09/2019,1:33PM” class=”svt-cd-green” ] मंत्रीपदाला आव्हान देणारी याचिका फेटाळली, विखे, महातेकर, क्षीरसागरांना दिलासा, आमदारकी नसताना मंत्रीपद दिल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”उदयनराजे भोसले आज खासदारकीचा राजीनामा देणार” date=”13/09/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ] पुणे : राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आज खासदारकीचा राजीनामा देणार, लोकसभा अध्यक्षांकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदयनराजे दिल्लीला रवाना होणार

[/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात पुलगाव येथे पतीकडून पत्नीची हत्या” date=”13/09/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात पुलगाव येथे पतीकडून पत्नीची हत्या, वैशाली संतोष चाडगे असं 40 वर्षीय मृत महिलेचं नाव, रात्रीच्या सुमारास ओढणीने गळा आवळत चाकूने वार करून हत्या, घटनेनंतर पती संतोष चाडगे पोलिसांसमोर स्वाधीन [/svt-event]

[svt-event title=”अमरावती जिल्ह्यात भातकुलीमधील वाठोडा शुकलेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान 4 युवक बेपत्ता” date=”13/09/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात भातकुलीमधील वाठोडा शुकलेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान 4 युवक बेपत्ता, बुडालेल्या गणेश भक्तांचा शोध सुरू, मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकाची युद्धस्तरावर मोहीम [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली” date=”13/09/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली, मनसे नेते, सरचिटणीस यांची मते जाणून घेणार, सकाळी 11 वाजता ‘कृष्णकुंज’वर बैठक होणार [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये गुंगीचं औषध देऊन शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार” date=”13/09/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये गुंगीचं औषध देऊन शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 50 वर्षीय व्यक्तीकडून मागील 3 वर्षापासून अत्याचार, नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वे लोकलसेवा विस्कळीत” date=”13/09/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम रेल्वे लोकलसेवा विस्कळीत, विरार स्थानकादरम्यान पॉईंट फेलियरमुळे गाड्या उशिरा, विरार ते चर्चगेटदरम्यान लोकल धीम्या गतीने सुरू [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या” date=”13/09/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या, राजेंद्र जाधव असं 51 वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव, कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात” date=”13/09/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात, 25 ऑगस्टला अरुण जेटलींच्या निधनानंतर स्थगित, अकोले येथे 10 वाजता, तर संगमनेर येथे दु 12.30 वा. सभा, राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणी गावात स्वागत होणार, दुपारी 3 वाजता राहुरी येथे जाहीर सभा, दुपारी 4.30 वाजता नगर शहरात रोड शो, मुख्यमंत्रीसोबत भाजपचे अनेक मंत्रीही उपस्थित राहणार, मुख्यमंत्र्यांचा नगरमध्येच मुक्काम [/svt-event]

[svt-event title=”बेस्ट कामगारांच्या वेतन करारासंदर्भात महत्त्वाची बैठक” date=”13/09/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] बेस्ट कामगारांच्या वेतन करारासंदर्भात आज सकाळी 10 वाजता बेस्ट भवनात महत्वाची बैठक, शिवसेनेकडून आपल्या सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात व्हिप [/svt-event]

[svt-event title=”आमदार पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव औरंगाबादला रवाना” date=”13/09/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] आमदार पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव औरंगाबादला रवाना, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना राजीनामा सादर करणार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधान परिषद शिवसेना गटनेते अॅड अनिल परब हेही उपस्थित, त्यानंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’त होणार शिवसेना प्रवेश [/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदार नारायण कुचेंसह 44 जण पोलिसांच्या ताब्यात” date=”13/09/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] अंबड शहरातील पाचोड नाका येथील पुतळ्याप्रकरणी पोलिसांची कारवाई, बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचेंसह 44 जण पोलिसांच्या ताब्यात, परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने कारवाई [/svt-event]

[svt-event title=”भाजपचा झेंडा लावून फिरला, तर घरात घालून मारु, सावनेरच्या काँग्रेस आमदाराची धमकी” date=”13/09/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] भाजपचा झेंडा लावून फिरला, तर घरात घालून मारु, सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदारांची भाजप कार्यकर्त्यांना धमकी, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, सिलेवाडा गावातील कार्यक्रमाची माहिती [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.