LIVE : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता

| Updated on: Sep 16, 2019 | 7:24 PM

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता
Follow us on

[svt-event title=”बुधवारपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता” date=”16/09/2019,7:23PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक उद्या (मंगळवार) महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत अहवाल तयार करून बुधवारी निवडणूक आयोगची पत्रकार परिषद होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत आघाडीची अदलाबदल” date=”16/09/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ] आघाडीत मुंबईतल्या दोन जागांची अदलाबदल केली जाणार, दिंडोशीची जागा राष्ट्रवादीला देणार, तर त्याबदल्यात गोरेगाव जागा काँग्रेस लढवणार. भांडुपची काँग्रेस लढवणार त्याबदल्यात एक जागा राष्ट्रवादीला देणार. [/svt-event]

[svt-event title=”‘भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आरोपपत्र दाखल करा'” date=”16/09/2019,4:00PM” class=”svt-cd-green” ] BREAKING – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे आणि इतर आरोपींविरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण करुन, 11 नोव्हेंबरपर्यंत सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”‘आरे’ कारशेडबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया” date=”16/09/2019,1:41PM” class=”svt-cd-green” ] नाणारचं काय झालं? ‘आरे’ कारशेडबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया. नाणार प्रकल्प रद्द झाला, आता आरे कारशेडचं काय होणार? [/svt-event]

[svt-event title=”आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरसाठी आग्रही : उद्धव ठाकरे” date=”16/09/2019,1:36PM” class=”svt-cd-green” ] आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरसाठी आग्रही आहोत. कोर्टात अंतिम सुनावणी आली आहे. कोर्टाचा योग्य निर्णय येईल. केंद्र सरकारने सुद्धा आता योग्य पाऊले उचलली पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबड्या फेकल्या” date=”16/09/2019,1:38PM” class=”svt-cd-green” ] सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबड्या फेकल्या [/svt-event]

[svt-event title=”महाजनादेश यात्रेत कोंबड्या फेकल्या” date=”16/09/2019,1:49PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शरद पवार स्वत: राज ठाकरेंशी चर्चा करणार- सूत्र” date=”16/09/2019,1:12PM” class=”svt-cd-green” ] मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार, सूत्रांची माहिती, विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका अस्पष्ट, ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरेंचा आघाडीच्या नेत्यांशी संपर्क नाही, राज यांची नेमकी भूमिका काय याबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी चर्चा करणार-सूत्र [/svt-event]

[svt-event title=”सातारा लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा” date=”16/09/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ] सातारा लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा,सूत्रांची माहिती, पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नाहीत, लोकसभेपेक्षा विधानसभेला चव्हाणांचं प्राधान्य [/svt-event]

[svt-event title=”सत्यजीत देशमुख भाजपमध्ये” date=”16/09/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ]

 

[svt-event title=”सावनेरमध्ये काँग्रेस आमदार आणि भाजप शहर अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल ” date=”16/09/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं, काँग्रेस आमदार सुनील केदार आणि भाजप शहर अध्यक्ष अनिल तंबाखे विरोधात गुन्हा दाखल, सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात धमकी प्रकरणात गुन्हा दाखल, महिला सरपंचाविरोधात चुकीच्या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी तंबाखे विरोधात गुन्हा दाखल, भाजपकडून अनिल तंबाखेची पक्षातून हकालपट्टी [/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणाचे आणखी आठ दरवाजे उघडले” date=”16/09/2019,7:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे आणखी आठ दरवाजे उघडले, 27 पैकी एकूण 12 दरवाजातून सहा हजारपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी सागंलीतील शेकडो झाडांच्या फांद्या छाटल्या ” date=”16/09/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] सांगली : मुख्यमंत्र्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी शहरात शेकडो झाडांच्या फांद्या छाटल्या, रथाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत ताराही तोडल्या, प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ विधीज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचा मुलगा केतन खुर्जेकरांचं अपघाती ” date=”16/09/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] मावळ : संचेती हॉस्पिटलचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख ज्येष्ठ विधीज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचे चिरंजीव डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे तळेगाव येथे अपघाती निधन, रविवारी रात्रीच्या सुमारास मुंबईवरुन परतत असताना गाडीचा टायर पंचर झाल्याने ड्रायव्हरला मदत करत असताना वोल्वो बसने दोघांनाही उडवले, यामध्ये डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर आणि ड्रायव्हर जागीच ठार [/svt-event]

[svt-event title=”राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांचे निधन ” date=”16/09/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांचं निधन, वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, संगमनेर तालुक्यावर शोककळा, दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार [/svt-event]