मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात
मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी अर्थात मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा जुंपण्यात आला आहे. राज्यातील भाजपाच्या सरकारमधील धुरीण सातत्याने महापुरूषांचा अवमान करीत असून त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. आघाडी सरकारमधील वरीष्ठ नेते ज्यात उद्धव […]
मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी अर्थात मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा जुंपण्यात आला आहे. राज्यातील भाजपाच्या सरकारमधील धुरीण सातत्याने महापुरूषांचा अवमान करीत असून त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. आघाडी सरकारमधील वरीष्ठ नेते ज्यात उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात येथे येत आहेत. जे.जे.तील क्रुडास कंपनी पासून ते टाईम्स इमारतीपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. टाईम्स इमारतीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे.
या मोर्चास शेवटपर्यंत परवानगी मिळते की नाही असे वातावरण राज्य सरकारने तयार केले होते. अखेर काल शेवटी उशीरा या मोर्चास लेखी परवानगी देण्यात आली होती. या पूर्वी रझा अकादमीने आझाद मैदानात 11 ऑगस्ट 2012 रोजी मोठा मोर्चा काढला होता. त्यास हिंसक वळण मिळाले होते. त्याविराेधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोठा मोर्चा काढला होता.