औरंगाबादेत मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट, दोन मुलं जखमी
औरंगाबाद : मोबाईल बॅटरीचा पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मोबाईल बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना, बॅटरीचा स्फोट होऊन दोन भावंडं जखमी झाली. आज सकाळी 9च्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्तीत ही घटना घडली. या स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णा रामेश्वर […]
औरंगाबाद : मोबाईल बॅटरीचा पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मोबाईल बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना, बॅटरीचा स्फोट होऊन दोन भावंडं जखमी झाली. आज सकाळी 9च्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्तीत ही घटना घडली.
या स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णा रामेश्वर जाधव वय 8 आणि कार्तिक रामेश्वर जाधव वय 5, अशी या बालकांची नावे आहेत.
VIDEO: पेट्रोल पंपावर मोबाईलचा स्फोट का होतो? जाणून घ्या
दरम्यान, हा स्फोट कसा झाला, मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र मोबाईल बॅटरी स्फोटाच्या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढली आहे.
याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे स्फोट झाल्याने अनेकजण जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
संबंधित बातम्या
तुमच्या मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी ‘हे’ कराच!
शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान
पेट्रोल पंपावर मोबाईलचा स्फोट का होतो? जाणून घ्या
शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान
ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!