पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात दोन आरोपी जखमी

पुणे-बंगळुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलीस आणि गुन्हेगांरांमध्ये झालेल्या चकमकीत दोन आरोपी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात दोन आरोपी जखमी
Follow us
| Updated on: Jan 28, 2020 | 11:47 PM

कोल्हापूर : पुणे-बंगळुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलीस आणि गुन्हेगांरांमध्ये झालेल्या चकमकीत दोन आरोपी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे (Firing Between Criminals-Police). याप्रकरणी जखमींसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे (Firing Between Criminals-Police).

पुणे-बंगळुरु महामार्गावर मंगळवारी (28 जानेवारी) रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. राजस्थान पोलिसांना चकवा देत सराईत गुन्हेगार दोन दिवसांपूर्वी धारवाडमध्ये आले होते. याबाबत कोल्हापूर पोलिसांना माहिती मिळाली होती. या गुन्हेगांरावर वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 25 गुन्हे राजस्थान पोलिसात दाखल आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता. रात्री 9 वाजता हे आरोपी किणी टोल नाक्यावर पोहोचले. गुन्हेगारांच्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात सुरुवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन गुन्हेगार जखमी झाले आहेत. यापैकी एकाला पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.