15000 पगार, दोन वीक ऑफ, काम मोबाईल चोरण्याचं!

नवी दिल्ली : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांची चौकशी करताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या गँगबाबत विचारणा केली. तेव्हा या चोरांनी त्यांची कुठली गँग नसून एक कंपनी असल्याची माहिती दिली. ही कंपनी कुठली साधी-सुधी कंपनी नसून ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखी आहे. या चोरांच्या कंपनीमध्ये त्यांना मोबाईल चोरण्याचं टार्गेट […]

15000 पगार, दोन वीक ऑफ, काम मोबाईल चोरण्याचं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांची चौकशी करताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या गँगबाबत विचारणा केली. तेव्हा या चोरांनी त्यांची कुठली गँग नसून एक कंपनी असल्याची माहिती दिली. ही कंपनी कुठली साधी-सुधी कंपनी नसून ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखी आहे. या चोरांच्या कंपनीमध्ये त्यांना मोबाईल चोरण्याचं टार्गेट दिलं जायचं आणि टार्गेट पूर्ण केलं तर त्याचं बक्षीसही मिळायचं. इतकंच नाही तर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या चोरांना आठवड्याला दोन दिवसांची सुट्टीही मिळायची.

दिल्ली पोलिसांनी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या गँगमध्ये आणखी कोण कोण आहे? याबाबत पोलिसांनी त्यांना विचारणा केली. तेव्हा त्या चोरट्यांनी आमची कुठलीही गँग नाही, तर आम्ही कंपनीत काम करत असल्याचं सागितलं. हे ऐकल्यावर पोलिसांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्या चोरट्यांनी सांगितलं की, आम्ही एका कंपनीत काम करतो, तिथे आम्हाला पाच दिवस काम करायचं असतं आणि शनिवार, रविवार या दोन दिवशी सुट्टी असते. आम्हाला टार्गेट दिलं जातं, म्हणजेच मोबाईल चोरण्यासाठी सांगितलं जातं. कंपनीमध्ये नोकरीवर ठेवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजेच मोबाईल चोरट्याला दररोज 500 रुपये त्यासोबत शाकाहारी, मांसाहारी जेवण आणि मद्य मोफत दिलं जातं. पण मोबाईल चोरण्याचं टार्गेट पूर्ण केल्यावरच त्यांना हे सर्व मिळतं, असंही त्या चोरट्यांनी सांगितलं.

चोरांची ही कंपनी चमन लाल नावाची व्यक्ती चालवतो. बोपी विश्वास नावाचा व्यक्ती या चमन लालचा खास आहे. या लोकांनी ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना नोकरीवर ठेवलं होतं. यांच्याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच जणांना यांनी नोकरीवर ठेवलं असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे चोरटे महिन्याच्या सुरुवातीचे 10 दिवस जास्त मेहनत करायचे. दिल्लीच्या कुठल्याही भागात मोबाईल चोरण्याची या चोरट्यांना मुभा होती. पण, ओमप्रकाश आणि ज्ञानेश यांची एनबी रोड ते बदरपूर, कालका मंदिर ते मां आनंदमयी मार्ग, आऊटर रिंग रोड ते बीआरटी या मार्गांवर चालणाऱ्या डीटीसी आणि क्लस्टर बस यांना खास पसंती होती. ते या मार्गावर दिवसाला 7 ते 8 मोबाईल चोरायचे. मोबाईल चोरी करण्यासाठी हे चोरटे बसच्या मागे ऑटो घेऊन जायचे. मोबाईल चोरी केल्यानंतर ते बसमधून उतरुन ऑटोत बसून पळ काढायचे, अशी माहिती या चोरट्यांनी दिली.

दिल्लीमध्ये चोरी केलेले मोबाईल तिथेच विकले जात नव्हते. तर गुरुदासपूर येथील सनी नावाचा व्यक्ती दर आठवड्याला हे मोबाईल या कंपनीकडून खरेदी करायचा. यामध्ये आयफोनला सर्वात कमी मागणी असते. कारण आयफोनचा आयएमईआय नंबर बदलणे कठीण असते. तसेच, याचे पार्ट्सही सहजासहजी विकले जात नाहीत. तर सॅमसंगच्या मोबाईलला या चोर बाजारात मोठी मागणी आहे. सर्वात जास्त नफा हा सॅमसंगच्या फोनवर होतो. पण, सॅमसंगचा महागतला मोबाईलही 10 हजारपेक्षा जास्त किंमतीत विकला जात नाही.

चोरट्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुरुदासपूर येथे सनीला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

VIDEO :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.