रेल्वेच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू, गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील घटना

गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू (Deer death on gondia railway line) झाला आहे.

रेल्वेच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू, गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील घटना
Follow us
| Updated on: Jan 05, 2020 | 6:26 PM

गोंदिया : गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू (Deer death on gondia railway line) झाला आहे. ही घटना आज (5 जानेवारी) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर घडली. या घटनेमुळे वन्य प्रेमिंनी आणि गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त (Deer death on gondia railway line)केली आहे.

गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगली रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने. अनेकदा जंगली प्राणी जंगलातून या रेल्वे मार्गाच्या पलिकडे येजा करत असतात. त्यामुळे ट्रेनच्या धडकेत अनेकदा अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. आज गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात असताना हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे मार्ग ओलांडत असतांना या दोन हरीण रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाला आहे.

यापूर्वीही तीन रानडुक्कर आणि सहा गायींचा याच रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूला तारांचे कंपाउड करण्याची मागणी अनेकदा वन्यप्रेमींनी आणि गावकऱ्यांनी केली. कंपाऊंड झाले की या रेल्वे मार्गावर कोणतेही वन्यप्राणी किंवा गायी येणार नाही आणि त्यांचा मृत्यीही होणार नाही, असं गावकऱ्यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाला सांगितले.

तसेच मागील डिसेंबर महिन्आच सहा गायी आणि तीन रान डुक्करांचाही ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही मृतक हरिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.