खबऱ्यांना ठार करणार, नक्षलींचं पत्र, गडचिरोलीत 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या

गडचिरोली: नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हैदोस घातला आहे. नक्षलवाद्यांनी 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या केली. गडचिरोलीशेजारील छत्तीसगड परिसरात आजही नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार तर एक महिला नक्षलवादी जखमी झाली. पायाला गोळया लागल्याने या महिला नक्षलवादीला पोलीसांनी ताब्यात घेतलं. सुकमा जिल्हयातील रंगाईगुडा जंगलात ही घटना घडली. गडचिरोली […]

खबऱ्यांना ठार करणार, नक्षलींचं पत्र, गडचिरोलीत 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

गडचिरोली: नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हैदोस घातला आहे. नक्षलवाद्यांनी 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या केली. गडचिरोलीशेजारील छत्तीसगड परिसरात आजही नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार तर एक महिला नक्षलवादी जखमी झाली. पायाला गोळया लागल्याने या महिला नक्षलवादीला पोलीसांनी ताब्यात घेतलं. सुकमा जिल्हयातील रंगाईगुडा जंगलात ही घटना घडली.

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात नेहमी नक्षली कारवाया होत असतात. पण 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 40  नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथक सी 60  ला मोठं यश आलं होतं. या चकमकीत तब्बल 40 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये नक्षलींच्या म्होरक्यांचाही समावेश होता.  गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देखमुख यांच्या नेतृत्त्वात हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गडचिरोली पोलीसांचं कौतुक केलं होते.

मात्र याच हल्ल्याचा बदला म्हणून नक्षलवादी आता नागरिकांची हत्या करत आहेत. पोलिसांना गावकऱ्यांनीच माहिती दिल्याने नक्षलवाद्यांच्या सभेवर हल्ला करुन पोलिसांनी 40 नक्षलवादी मारल्याचा दावा नक्षलवाद्यांचा आहे. त्याच रागातून आदिवासींचं हत्यासत्र सुरु आहे.

21 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील कसनासुर गावात एका लग्न समारंभात हे सर्व नक्षलवादी आले होते. त्यांनी इंद्रावती नदीकाठी एक सभा आयोजित केली होती. या सभेसाठी  साईनाथ, श्रीनिवास, आणि नंदु डिविजन कमांडर सेंट्रल कमिटी सदस्य आले होते. या तीन कमांडरवर दोन कोटीपेक्षा जास्त बक्षीस होते. या सर्वांना ठार करण्यात आलं. त्यामुळे नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं.

पण एक वर्ष उलटण्यापूर्वीच त्याच भागात नक्षलवाद्यांनी पुन्हा दहशत निर्माण केली आहे. भामरागड आणि एटापलली या दोन तालुक्यात नक्षलवाद्यांनी हत्यांचं सत्र सुरू केले आहे. 22 एप्रिल 2018 रोजी पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या सभेवर जो हल्ला केला होता, त्याबाबतची माहिती कसनासूर गावकऱ्यांनी आणि काही खबरऱ्यांनी पोलिसांना दिल्याचा दावा नक्षलवाद्यांचा आहे.

21 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता 130 ते 150 नक्षलवाद्यांनी कसनासूर गावात येऊन गावकऱ्यांना मारहाण केली. रात्री एक वाजता 7 आदिवासी नागरिकांचं अपहरण करुन त्यांना घेऊन गेले. या दहशतीच्या वातावरणात पूर्ण गावाने ताडगाव पोलीस स्टेशन गाठून, 130  नागरिकांनी चार-पाच दिवस पोलीस स्टेशनमध्येच वास्तव्य केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी 

पहिली घटना

कोसफुंडी फाट्याजवळ तिघांचे मृतदेह आढळून आले.  मालू  डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी यांचे मृतदेह आढळले. मग नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या चारपैकी तिघांची पाच दिवसांनी सुटका केली.

दुसरी घटना 

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ताळगुडा सोनसाय तानु बेग या 32 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली.

तिसरी घटना 

1 फेब्रुवारीला दुपारी पेनंगुडा फाट्याजवळ वाले पंजा कुडयामी वय 50 वर्ष या आदिवासी नागरिकाची हत्या करण्यात आली.

त्यानंतर आज 2 फेब्रुवारीला पहाटे धानोरा तालुक्यातील मरकेगाव भागात दोन आदिवासींची हत्या करण्यात आली. हे आदिवासी आत्मसर्मपण नक्षलवादी असल्याची माहिती मिळत आहे.  नक्षलवाद्यांच्या या हत्यासत्रामुळे गडचिरोली जिल्हा दहशतीत आहे.

नक्षलवाद्यांकडून हत्यांचं सत्र सुरुच आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी पत्रकेही सोडून, खबऱ्यांची हत्या करण्यात येत आहे, असं त्यावर म्हटलं आहे. “माओवादी संघटनेने 40 माओवादीयों की जान का बदला लिया है” असा संदेश त्या पत्रकांवर आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.