‘Sacred Games 2’ मध्ये दोन नवे चेहरे दिसणार
मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच ‘सेक्रेड गेम्स 2’ सिजनचा टीजर रिलीज करण्यात आला. 26 सेकंदांच्या या टीजरमध्ये बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय दोन नवे चेहरे पाहायला मिळाले. सेक्रेड गेम्सच्या या वेबसिरीजमधील हे दोन नवे चेहरे आहेत कल्कि कोचलिन आणि रणवीर शौरे. त्यामुळे ही […]
मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच ‘सेक्रेड गेम्स 2’ सिजनचा टीजर रिलीज करण्यात आला. 26 सेकंदांच्या या टीजरमध्ये बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय दोन नवे चेहरे पाहायला मिळाले.
सेक्रेड गेम्सच्या या वेबसिरीजमधील हे दोन नवे चेहरे आहेत कल्कि कोचलिन आणि रणवीर शौरे. त्यामुळे ही थ्रिलर सीरीज पाहणे प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक होणार आहे. या दोन भुमिकांचं एकूण मालिकेत काय स्थान आहे आणि ते कथेत काय नवे वळण आणणार याचीही उत्सुकता ताणली जात आहे. याचा उलगडा लवकरच होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर शेअर करत लवकरच सीजन 2 येणार असल्याचे नमूद केले आहे.
Season 2 is coming. Put your chattris in the air. #SacredGamesS2 pic.twitter.com/1ACW0eVGDe
— Netflix India (@NetflixIndia) May 6, 2019
‘पोलीस अधिकारी सरताज सिंहची मुंबई वाचवण्याची लढाई’
या वेबसिरीजविषयी दर्शकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. याची प्रचिती सीरीजचं टीजर आल्यानंतर तात्काळ आली. टीजर लॉन्च झाल्यानंतर काही तासातच लाखो दर्शकांनी हा टीजर पाहायला. ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीजनमधील कथा पोलीस अधिकारी सरताज सिंहच्या (सैफ अली खान) मुंबई शहर वाचवण्याच्या प्रयत्नांनी होईल. तसेच गणेश गायतोंडेला (नवाजुद्दीन सिद्दीकी) मुंबईचा सर्वात मोठा डॉन म्हणून जागा कायम राखण्यासाठी मिळणारे नवे मोठे आव्हानं देखील यात पाहायला मिळेल. या सुरुवातीनंतर पुढे काय होणार याबद्दल अनेक तर्क लावले जात आहे. मात्र, हे वेबसिरीज आल्यानंतरच स्पष्ट होईल.
‘गणेश गायतोंडे या पात्राच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग कश्यपकडे’
आकर्षक गुरुजी (पंकज त्रिपाठी) या पात्राची मागील सीजनमध्ये ओळख गायतोंडेचा ‘तिसरा बाप’ अशी झाली आहे. आता या सीजनमध्ये या पात्राची भूमिका अधिक महत्वाची असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यप या सीजनमध्ये गणेश गायतोंडेचे दिग्दर्शन करतील. दुसरीकडे दिग्दर्शक नीरज घायवान सरताज सिंह या पात्राचे दिग्दर्शन करतील.
पहिल्या सीजनमध्ये राधिका आपटे आणि कुब्रा सेठ यांच्याही महत्वच्या भूमिका होत्या. डिसेंबर 2018 मध्ये ‘मिर्जापूर’ वेबसिरीजमधील अभिनेत्री हर्षिता गौरने ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीजनमध्ये तिला महत्वाची भूमिका मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता. त्यामुळे तिलाही या सीजनमध्ये दर्शक पाहू शकतील.
पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीनचा प्रमुख साथीदार बंटीची भूमिका करणारा अभिनेता जतिन सरना दुसऱ्या सीजनमध्ये देखील पाहायला मिळेल. पहिल्या सीजनमध्ये त्याचा मृत्यूचा झाल्याचे दाखवण्यात आले असले, तरी त्याची या सीजनमध्ये महत्वाची भूमिका असेल.