चंद्रपुरात क्वारंटाईन सेंटरमधील दोघांचा मृत्यू, एकाचा गळफास, तर दुसऱ्याचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू
चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वारंटाईन केंद्रात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला (Two People Death in quarantine center Chandrapur) आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वारंटाईन केंद्रात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला (Two People Death in quarantine center Chandrapur) आहे. त्यांच्या मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या क्वारंटाईन केंद्रातील एका खोलीत मजुराने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तर दुसऱ्या व्यक्तीचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला (Two People Death in quarantine center Chandrapur) आहे.
गळफास घेऊन आत्महत्या केलेला मजूर हा 7 दिवसांपूर्वी नागपूरहून आला होता. हा मजूर मुळचा शहरातील शामनगरचा रहिवासी होता. मिथुन सरकार असं आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. तर ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष निकोडे असे आहे. हा व्यक्ती सात दिवसांपासून क्वारंटाईन केंद्रात दाखल होता. हा व्यक्ती मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहे.
या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले.
आत्महत्या केलेल्या मिथुन सरकारच्या खोलीत पोलिसांनी तपास सुरु केला. तसेच आत्महत्येमागचे कारण अद्याप पोलिसांना समजले नसून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात 12 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 10 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार