नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद
बुलडाणा : गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्यात 15 जवान शहीद झाले. या शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश आहे. सर्जेराव एकनाथ खार्डे (आळंद, तालुका देऊळगावराजा) आणि राजु नारायण गायकवाड (मेहकर) अशी या शहीद जवानांची नावे आहेत. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने महाराष्ट्र दिनालाच महाराष्ट्र हादरला. बुलडाण्यातही यामुळे शोककळा पसरली आहे. 2 […]
बुलडाणा : गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्यात 15 जवान शहीद झाले. या शहीदांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश आहे. सर्जेराव एकनाथ खार्डे (आळंद, तालुका देऊळगावराजा) आणि राजु नारायण गायकवाड (मेहकर) अशी या शहीद जवानांची नावे आहेत.
नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने महाराष्ट्र दिनालाच महाराष्ट्र हादरला. बुलडाण्यातही यामुळे शोककळा पसरली आहे. 2 महिन्यांपूर्वीही पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे 2 जवान शहीद झाले होते. ते दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खर्डे यांना 2 वर्षे वयाची मुलगी आहे. त्यांच्यामागे पत्नी स्वाती, आई-वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. सर्जेराव 2011 मध्ये गडचिरोलीला भरती झाले होते. त्यांचे ट्रेनिंग सोलापूरला झाल्याचे सांगितले जाते. सर्जेराव यांच्या आई कमलबाई या सध्या आळंदीच्या उपसरपंच आहेत.
दुसरे शहीद जवान राजू गायकवाड (वय 34 वर्षे) 7 वर्षांपूर्वी गडचिरोली येथे भरती झाले होते. गायकवाड यांचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना 3 वर्षांची मुलगी आणि 4 महिन्यांचा मुलगा आहे. त्यांचा मोठा भाऊ 2 वर्षांपूर्वी वारला. मात्र, या दोन्ही जवानांच्या जाण्याने जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या:
गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण
गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश
जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक
गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?
आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!