गजरे विकणारी मुलं ‘इस्रो’ भेटीला, ठाण्याच्या सिग्नल शाळेतील दोघांची निवड
नेहमीच हायवेवर गजरे किंवा खेळणी तसेच विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या दोन मुलांची भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) भेटीसाठी (Thane Student meet ISRO) निवड झाली आहे.
ठाणे : नेहमीच हायवेवर गजरे किंवा खेळणी तसेच विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या दोन मुलांची भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) भेटीसाठी (Thane Student meet ISRO) निवड झाली आहे. ठाण्यातील सिग्नल शाळेत ही मुलं शिकतात. या सिग्नल शाळेतील मुलं नेहमीच चर्चेत असतात. यंदा थेट सातासमुद्राच्या पार जाणार असल्याने पुन्हा एकदा या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले (Thane Student meet ISRO) जात आहे.
ठाण्यातील सिग्नल शाळेत शिकणारे विद्यार्थी अतुल पवार आणि किरण काळे यांनी गेल्या वर्षी डोंबिवली येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी समुद्राच्या खाऱ्यापासून गोडे पाणी बनविण्याचा प्रयोग मांडला होता. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या प्रयोगाचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे इस्रोकडूनही या मुलांचे कौतुक झाले.
राज्यातील शंभरहून अधिक शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता. यातील पहिल्या दहा शाळेतील प्रत्येकी दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड होणार होती. सिग्नल शाळेचा या स्पर्धेत सातवा क्रमांक आला.
हे विद्यार्थी येत्या 13 ते 17 मार्चला इस्रो भेटीसाठी जाणार आहेत. तीन दिवस तेथे राहून ते इस्रोची माहिती घेणार आहेत. हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या फावल्या वेळेत विविध प्रकारच्या वस्तू विकतात. ठाण्यातील तीन हात नाका येथे त्यांची सिग्नल शाळा आहे. इस्रोच्या भेटीबद्दल विध्यार्थ्यानी आनंद व्यक्त केला आहे.