नवी मुंबईत साप चावल्याने दोन वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू
कोपरी गावातील तलावाजवळील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका दोन वर्षीय मुलाला साप चावल्याने मृत्यू झाला (Two years boy death due to snake bite) आहे.
नवी मुंबई : कोपरी गावातील तलावाजवळील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका दोन वर्षीय मुलाला साप चावल्याने मृत्यू झाला (Two years boy death due to snake bite) आहे. या घटनेमुळे परिसरातील मुलं आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमीत सोनकांबळे असं मृत मुलाचे (Two years boy death due to snake bite) नाव आहे.
महापालिकेने सव्वाचार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या अॅम्युजमेंट पार्कमध्ये आणि तलावा जवळील उद्यानात खेळण्यासाठी रोज शेकडो लहान मुले येतात. सुमित सोनकांबळे देखील आपल्या आजोबांसोबत खेळण्यासाठी उद्यानात आला होता. मात्र खेळता खेळता सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला एका सापाने दंश केला. दंश केल्याने त्याला उपचारासाठी वाशीतील मनपा दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नवी मुंबईत गेल्या काहीदिवसांपासून सापांचा वावर वाढला आहे. त्यातील बरेच साप सर्प मित्रांनी पकडून जंगलात सोडले आहेत. कोपरी गाव सेक्टर 26 येथील तलावाजवळील उद्यानातही सापांचा वापर अलीकडे दिसत होता.