नागपूर : नागपुरात दोन तरुणांच्या हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे (Two Youth Murder By Gang-war). याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. टोळी युद्धातून या तरुणांची हत्या झाल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. कुणाल चरडे आणि सुशील बावणे अशी मृतकांची नावे आहेत (Two Youth Murder By Gang-war).
नागपूरजवळच्या पाचगावपासून दोन किमी अंतरावर नागपूर-कुही मार्गावर दोघांची हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे हत्याकांड टोळी युद्धातून घडलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी रस्त्यावरुन येणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्याची माहिती पोलिसांनी कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे निदर्शनास आलं.
या दोघांचीही ओळख पटली असून कृणाल ठाकरे आणि सुशील बावणे अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळी भांडणाची, झटापटीची कोणत्याही खुणा नसल्याने दोघांची इतरत्र हत्या करुन पाचगावजवळ आणून फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे (Two Youth Murder By Gang-war).
हे दोघेही नागपूरच्या कुख्यात ठवकर टोळीचे हस्तक असून हा गुन्हेगारांमधील गँगवारचे प्रकार असल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करत तीन आरोपींना अटक केली आहे.
ऐन दिवाळीच्या काळात या दुहेरी हत्याकांडाने नागपुरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, यातून आणखी टोळी युद्ध पेटणार तर नाही ना, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.
रात्री साडेबारा वाजता दार ठोठावलं म्हणून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना https://t.co/Jwy3wnelBG
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2020
Two Youth Murder By Gang-war
संबंधित बातम्या :
कल्याणमधील थरार! बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा, 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास
रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या
Beed Acid Attack : प्रेयसीला अॅसिड टाकून जाळणाऱ्या नराधमाला नांदेडमध्ये अटक