पंतप्रधानांच्या मुलीने दिला इन्स्टावरून पतीला तलाक, म्हणाली, ‘डियर, तू दुसरीकडे…’
शेखा माहरा बिन्त यांचा गतवर्षी निकाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी एका कन्येला जन्म दिला होता. मात्र, शेखा माहरा बिन्त यांनी सोशल मीडियावरून तिच्या पतीला तलाक देत असल्याची घोषणा केली आहे. शेखा माहरा या संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांच्या कन्या आहेत.
मुस्लीम धर्मात तलाक देण्याची पद्धत काही नवीन नाही. काही व्यक्ती तोंडी तलाक देतात. तर काही व्यक्ती नातलग यांच्यामार्फत तलाक देत असल्याचे जाहीर करतात. पंरतु, दुबईचे राजे आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांच्या मुलीने सोशल मिडीयावरून आपल्या पतीला तलाक देत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात त्यांचा निकाह झाला होता. तर, दोन महिन्यापूर्वीच त्यांनी एका कन्येला जन्म दिला होता. दुबईचे राजे आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या शेखा माहरा बिन्त यांनी सोशल मिडीयावर ही घोषणा केली आहे.
शेखा माहरा बिन्त यांनी पती शेख मना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना यांना सोशल मीडियावरून तलाक दिला. सोशल मिडीयावर पोस्ट करताना त्या म्हणाल्या, ‘डियर हसबेंड! तुम्ही इतर लोकांसोबत बिझी असाल. पण, मी आपल्या तलाकची घोषणा करत आहे. मी तुम्हाला तलाक देते, मी तुम्हाला तलाक देते, मी तुम्हाला तलाक देते. तुमचीच माजी पत्नी’ असे माहरा बिन्त यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
1994 मध्ये जन्मलेल्या माहरा बिन्त यांनी गतवर्षी 27 मे रोजी शेख मना बिन यांच्याशी निकाह केला होता. त्यानंतर पाच महिन्यातच त्यांनी आपण गर्भवती असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर गर्भवती असतानाचे फोटोही शेअर करत त्यांनी त्याखाली ‘आम्ही तीन’ असे म्हटले होते. परंतु, माहरा बिन्त यांनी घटस्फोटाची घोषणेची पोष्ट करताना त्याखाली स्वत:चा आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे. आता त्यांनी ‘आम्ही दोघे’ इतकेच सूचक शब्द लिहिले आहेत. माहरा बिन्त यांनी यांनी आपल्या मुलीचे नाव हिंद असे ठेवले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, महारा बिन्त हिच्याशी संबंधित काही लोकांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. महारा हिच्या या पोस्टवर युजर्सच्या कमेंट्सही येत आहेत. अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती दाखविली आहे. एका युजरने राजकुमारी शेखा महारा बिंत हिच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले. ‘हा जीवनाचा एक टप्पा आहे. चांगुलपणा आणि कटुता येत असते. आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने याला वाईट बातमी म्हटले आहे.