गडकिल्ले लग्नासाठी भाड्याने देण्यात चुकीचे काय? : उदयनराजे
सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा उल्लेख आहे. यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही, असं म्हणत उदयनराजेंनी निर्णयाचं समर्थन केलं आहे.
मुंबई : गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर देण्यात चुकीचे काय? असं मत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje on Renting Forts for Wedding) व्यक्त केलं आहे. सरकारच्या धोरणाला माध्यमांकडून चुकीचं वळण देण्यात आले आहे, अशा शब्दात उदयनराजेंनी खापर फोडलं.
मी स्वतः पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या मुद्यावर चर्चा केली. त्यांनी मला सरकारचं धोरण पूर्णपणे समजावून सांगितलं. सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा उल्लेख आहे. यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. आपण देवळात लग्न लावतोच ना? असा प्रश्न करत गडकिल्ले भाड्यावर देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
गडकिल्ले भाड्यावर दिल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, अशी आशाही उदयनराजेंनी व्यक्त केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यभरातील 25 गडकिल्ल्यांची भाडे तत्वावर देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादीसह विरोधकांकडून कडकडीत निषेध (Udayanraje on Renting Forts for Wedding) करण्यात आला होता.
गडकिल्ल्याबाबत निर्णय काय?
पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं होतं.
“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.
पन्हाळ्यावरील रोमँटिक गाण्यावरुन ट्रोल, खासदार अमोल कोल्हेंचं उत्तर
उदयनराजे भोसले यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उदयनराजे भाजपकडून रिंगणात उतरले असून त्यांच्याविरोधात महाआघाडीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.