उद्धव ठाकरेंचं महाबळेश्वरमध्ये सहकुटुंब ‘न्यू इयर’ सेलिब्रेशन
महाबळेश्वर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेलं आहे. त्यातचं शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे सोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबशळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या काही जवळच्या नातेवाईकांसह ठाकरे कुटुंब महाबळेश्वर येथे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी […]
महाबळेश्वर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेलं आहे. त्यातचं शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे सोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबशळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या काही जवळच्या नातेवाईकांसह ठाकरे कुटुंब महाबळेश्वर येथे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत.
उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी सहकुटुंब येथे आले असून त्यांचा हा दौरा संपूर्ण खासगी आहे. त्यामुळे मीडियाला याठिकाणी परवानगी नाही. ठाकरे कुटुंब सध्या विल्सन पॉइंटजवळ असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या ”फोरऑक्स” बंगल्यात मुक्कामी आहेत.
थंडगार हवा आणि गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी, तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनीची गर्दी जमली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेलं आहे. महाबळेश्वरची गुलाबी थंडी प्रत्येकाला भारावून सोडत आहे. महाबळेश्वरच्या थंडीत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणांहून पर्यटक महाबळेश्वरला भेट देत आहेत.
नवीन वर्षाच्या निमित्ताने महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना या बाजार पेठेत फेरफटका मारताना एक वेगळाच आनंद मिळतो आहे. वेगवेगळ्या नवनवीन अशा गोष्टीच्या खरेदी साठी बाजार पेठ फुलून गेली आहे