कुत्र्याची जबाबदारीही…; उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कुत्र्याची जबाबदारीही...; उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:17 PM

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकार गुंडांच्या पाठीमागे असेल तर गुंडगिरी वाढणार

सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभं रहात असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती मेलेडी खाओ सब जान जाओ. आता अशी परिस्थिती आहे ती ‘भाजपमे आओ सब भूल जाओ’ ही मोदी गॅरेंटी आहे. सरकार गुंडांच्या मागे उभं राहिलं तर अशीच गुंडगिरी राहील. यापुढच्या पिढ्या, आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का असा जनेतला प्रश्न जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

अभिषेक घोसाळकर प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही

भिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी मोठा संशय व्यक्त केला. दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरची फेसबूक लाइव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. मात्र या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. अभिषेकवर गोळ्या झाडण्यात आल्याचं फेसबूक लाइव्ह दरम्यान दिसलं, पण त्याच्यावर गोळ्या कोणी झाडल्या ते दिसतं नाहीये. मॉरिसने त्याला मारलं तरी मग त्याने स्वत:ला का संपवलं? त्याच्याकडे लायसन्स असलेलं पिस्तुल नव्हतं. त्याने हत्येसाठी त्याच्या बॉडीगार्डचं पिस्तुल वापरलं. पण त्या मॉरिसने मुळात बॉडीगार्ड का ठेवला होता ? त्याच्यावर अशी वेळ का आली होती ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अभिषेकवर गोळ्या खरंच मॉरिसने चालवल्या की इतर कोणी, त्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का ? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.