UGC कडून देशातील 24 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर, उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश
देशभरात बनावट विद्यापीठांचा सुळसुळाट झाल्याचं समोर आलं आहे. नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील अशा बनावट विद्यापीठांची यादीच जाहीर केली आहे (UGC declares list of 24 Fake universities in India ).
नवी दिल्ली : देशभरात बनावट विद्यापीठांचा (Fake Universities in India) सुळसुळाट झाल्याचं समोर आलं आहे. नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील अशा बनावट विद्यापीठांची यादीच जाहीर केली आहे (UGC declares list of 24 Fake universities in India ). यात 24 विद्यापीठांचा समावेश आहे. या 24 बनावट विद्यापीठांपैकी सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. विशेष म्हणजे या बनावट विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचाही समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यादीप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये 8 आणि दिल्लीत 7 बनावट विद्यापीठं आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांमध्ये प्रत्येकी 2 बनावट विद्यापीठं आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आहे.
बनावट विद्यापीठांची यादी
महाराष्ट्र
- राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर
दिल्ली
- कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली
- युनाइटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
- व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
- ए.डी.आर सेंट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी, ए.डी.आर हाऊस, 8 जे, गोपाल टॉवर, 25 राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
- इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, नवी दिल्ली
- विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, इंडिया, रोजगार सेवा सदन, 672, संजय एन्क्लेव्ह, नवी दिल्ली
- आध्यात्मिक विश्वविद्यालय, विजय विहार, रिठाला, रोहिणी
कर्नाटक
- बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, गोकाक, बेळगाव
केरळ
- सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम्
पश्चिम बंगाल
- इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन, 80, चौरंगी रोड, कोलकाता
- इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन अँड रिसर्च, 8ए, डायमंड हार्बर रोड ब्यूटिच इन, ठाकुर पूकीर, कोलकाता
उत्तर प्रदेश
- वारणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी
- महिला ग्राम विद्यापीठ/विश्वविद्यालय, प्रयाग
- गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग
- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो काम्ल्पेक्स होमियोपॅथी, कानपूर
- नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी अचलताल, अलीगड
- उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, कोसी कलां, मथुरा
- महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगड
- इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद्, इंस्टीट्युशनल एरिया, खोडा, मकनपूर, नोएडा
ओडिसा
- नव भारत शिक्षा परिषद्, अन्नपूर्णा भवन, शक्ति नगर, राउर केला
- नॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नोलॉजी, मयूरभंज
पुडुचेरी
- श्री बोधी अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन
आंध्र प्रदेश
- क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डिम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर
हेही वाचा :
परीक्षा घ्या, पण कशा? ‘सामना’तून सवाल, निर्मला सीतारामन यांच्यावरही टीकास्त्र
UGC declares list of 24 Fake universities in India