उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट, वृद्ध महिलेच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले (Ulhasnagar Corona Patient) आहे.

उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट, वृद्ध महिलेच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 5:44 PM

उल्हासनगर : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Ulhasnagar Corona Patient) असताना अनेक जिल्हे या विळख्यात अडकत चालले आहे. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र हा आता हॉटस्पॉट ठरत चाललं आहे. आज एकाच दिवशी 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील अशोकनगरमध्ये (Ulhasnagar Corona Patient) एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या काही नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात आणखी 12 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

तर दुसरीकडे चोपडा कोर्ट परिसरातील मुंबईत तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची तपासणी केली असता, त्यात 4 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

त्याशिवाय गोल मैदान परिसरात एका इसमाचा ही कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या सर्व परिसरांना कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करून सील केला आहे. या सर्व 17 रुग्णांना उपचारासाठी कोविडं हॉस्पिटलमध्ये दाखल केला असून यांच्यावर उपचार सुरू आहे. यातील चार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान उल्हासनगरमध्ये झोपडपट्टी असलेले भाग हा महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. पालिका प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र उल्हासनगरमधील रहिवाशी याला साथ देत नसल्याचा चित्र दिसत आहे.

अनेक लोक सकाळ संध्याकाळ विनाकारण घराबाहेर पडतात. या कारणाने उल्हासनगरमधील रुग्णांची संख्या वाढत आहे. तर उल्हासनगरमध्ये राहणारे आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचाऱ्यांमुळे सुद्धा ही संख्या वाढत आहे. मुंबईत काम करणाऱ्यांची मुंबईतच सोय व्हावी म्हणून पालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. मात्र तस होताना काही दिसत नाही.

दरम्यान जर अशाच प्रकारे कोरोना रुग्णांचे आकडे वाढत राहिले तर उल्हासनगरसाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. सध्या उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 35 वर गेली (Ulhasnagar Corona Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये

Nashik Corona Update | नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता कहर, मालेगावातील आकडा 500 च्या उंबरठ्यावर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.