अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं दुसरं लग्न, दाऊदच्या भाच्याची कबूली

पाकिस्तानमध्ये लपलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केल्याचे म्हटले जात आहे. दाऊदची धाकटी बहिण हसीना पारकर हिचा मुलाने एनआयएला ही माहिती दिली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं दुसरं लग्न, दाऊदच्या भाच्याची कबूली
DAWOODImage Credit source: DAWOOD
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 12:43 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी कुख्यात दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केले असल्याचे वृत्त आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या मुलाने म्हणजेच दाऊदचा भाचा अलीशाह याने राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएला ही माहिती सांगितली आहे. आपल्याला ही बातमी दाऊदच्या पहील्या पत्नीनेच सांगितल्याचे दाऊदच्या भाच्याने म्हटले आहे. एनआयएने गेल्यावर्षी कारवाई करीत आरोपपत्र दाखल केले हाेते, त्यातून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. पाकिस्तानाच लपलेला मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमने याने दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानच्या एका पठाण परीवाराशी संबंधित आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए समोर दाऊदची धाकटी बहिण हसीना पारकर हीचा मुलाने सप्टेंबर 2022 मध्ये दिलेल्या जबाबात ही कबुली दिली आहे. एनआएने मुंबईसह अनेक जागांवर छापे टाकून अंडरर्ल्ड डॉन दाऊदच्या टेटर नेटवर्कचा तपास करीत असताना अनेक लोकांना अटक केली होती. एनआयएने यासंदर्भात आरोपपत्रही दाखल केले होते. या आरोपपत्रातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दाऊदच्या भाच्याचे धक्कादायक खुलासे

एनआयएने दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह याचा जबाब सप्टेंबर 2022 मध्ये नोंदवला होता. ज्यात अलीशाह याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. अलीशाहने म्हटले आहे की मामूने दुसरे लग्न केले आहे. त्यांची दुसरी पत्नी पाकिस्तानच्या प्रतिष्ठीत घराण्यातील आहे. एनआयएला दिलेल्या जबाबात दाऊदने दुसरा विवाह केल्यानंतर त्याची पहीली पत्नी महजबीन हीला तलाक दिल्याचे म्हटले जात असले तरी त्यात काही तथ्य नसल्याचा दावा त्याने केला आहे.

दाऊदची असू शकते ही चाल

तपास यंत्रणांनी आपला रोख त्याची पहीली पत्नी महजबीनपासून दूर करावा यासाठी दुसरा विवाह ही दाऊदची काही वेगळी चाल असू शकते असा तपास यंत्रणांना संशय आहे.  अलीशाह याने राष्ट्रीय  तपास एजन्सी एनआयला सांगितले की तो दाऊदची पहिली पत्नी महजबीन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. तिनेच आपल्याला दाऊदच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगितले.

पहिली पत्नीच भारतातल्या नातेवाईकांना व्हाट्सअप करते

महजबीननेच अलीशाह याला दाऊद इब्राहिमने दुसरे लग्न केल्याचे सांगितले होते. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीनच आपल्या भारतातील  नातेवाईकांना व्हाट्सअपवरून कौटुंबिक घडामोडी सांगत असते. तसेच दाऊदच्या नव्या पत्त्याविषयीही त्याने काही नवीन सांगितले आहे. दाऊद इब्राहिम आता कराचीच्या डिफेन्स एरीयात अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे रहीम फाकीजवळ राहतो अशीही माहिती अलीशाह याने दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.