‘आलिया दारात अजब वरात’, अनोखा विवाह सोहळा संपन्न
अमरावती : विवाह सोहळा म्हटला की, वराची वरात घोड्यावरून धुमधडाक्यात निघताना आपण नेहमीच पाहतो. मात्र अमरावतीकरांनी आज चक्क एका नवरीची वरात घोड्यावरून धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पहिल्यांदाच बघायला मिळाली. यासोबतच मुला-मुलींमध्ये भेदभाव नसावा असा संदेश त्यांनी दिला. या आगळ्यावेगळ्या वरातीमध्ये बहुसंख्य मंडळी उत्साहाने सहभागी झाले होते. अमरावतीच्या यशोदा नगरमध्ये राजेश सोनोने यांचे संयुक्त कुटुंब राहते. […]
अमरावती : विवाह सोहळा म्हटला की, वराची वरात घोड्यावरून धुमधडाक्यात निघताना आपण नेहमीच पाहतो. मात्र अमरावतीकरांनी आज चक्क एका नवरीची वरात घोड्यावरून धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पहिल्यांदाच बघायला मिळाली. यासोबतच मुला-मुलींमध्ये भेदभाव नसावा असा संदेश त्यांनी दिला. या आगळ्यावेगळ्या वरातीमध्ये बहुसंख्य मंडळी उत्साहाने सहभागी झाले होते.
अमरावतीच्या यशोदा नगरमध्ये राजेश सोनोने यांचे संयुक्त कुटुंब राहते. त्यांना दोन मुली असून त्यांची जेष्ठ कन्या शीतलचा विवाह ठरला. लग्नाच्या एक दिवस आधी वराची वरात काढण्याची प्रथा सगळीकडे असते. त्याच धर्तीवर मुलीच्या घरच्यांनी मुलगा मुलगीमध्ये भेदभाव न ठेवता मोठ्या उत्साहात आपल्या निवासस्थान येथून नवरीची घोड्यावरून वरात काढण्यात आली.
समाजामध्ये वावरत असताना अनेकदा भाषणातून मुला-मुलींमध्ये अंतर ठेवू नये असे सांगितले जाते. परंतु जेव्हा मुलाचे लग्न किंवा मुलीचे लग्न जुळते, त्यावेळी मुलाच्या लग्नात अमाप खर्च केला जातो, तर मुलीच्या लग्नात हात राखून खर्च करतात. मुलींमध्ये आणि मुलांमध्ये अंतर नसावे. मुला-मुलींमध्ये भेदभाव नसावा असा संदेश यावेळी मुलीच्या घरच्यांनी दिला.
व्हिडीओ :
आजही देशात अनेक घटना घडत आहेत. जेथे मुलगी म्हटले की, अनेकांचे नाक मुरडले जाते. तसेच मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. मात्र अमरावतीसारख्या खेडेगावातील सोनोने कुटुंबाने सुंदर असा संदेश देत धुमधडाक्यात आपल्या मुलीचे लग्न केले आहे.