नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता (Unlock-3 Guidelines Issues). त्यानंतर आता हळूहळू देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी देश अनलॉक केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (29 जुलै) अखेर ‘अनलॉक-3’च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून अनलॉक-3 ची सुरुवात होणार आहे. ‘अनलॉक-3’मध्ये कंटेनमेंट झोन बाहेरील अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे (Unlock-3 Guidelines Issues).
दरम्यान, गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार, सर्व कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कठोर लॉकडाऊन असेल. 5 ऑगस्ट 2020 पासून रात्रीचा कर्फ्यूही लागू नसेल.
Ministry of Home Affairs (MHA) issues #Unlock3 guidelines. Restrictions on the movement of individuals during night have been removed. Yoga institutes and gymnasiums will be allowed to open from August 5, 2020. pic.twitter.com/eTTJwWei0K
— ANI (@ANI) July 29, 2020
‘अनलॉक-3’मध्ये काय सुरु?
– ‘अनलॉक 3’च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपासून व्यायामाच्या संस्था सुरु होऊ शकतात. तरी, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.
– ‘अनलॉक 3’मध्ये काही सवलती देण्यात आल्या असल्या, तरीही कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे
– ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहिल.
– गृह विभागाकडून अनुलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिक स्वतंत्र्य दिवस साजरा करु शकणार आहेत.
हेही वाचा : Unlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, नाईट कर्फ्यू हटवला, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी
Unlock-3 Guidelines Issues
‘अनलॉक-3’मध्ये काय बंद?
– शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणि संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंदच राहातील
– चित्रपट गृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल, अशा प्रकारच्या सर्व ठिकाणांवर बंदी असेल.
– गृह मंत्रालयाने दिलेल्या परवानगीशिवाय सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.
– मेट्रो रेल्वे सेवेवरही बंदी कायम राहील.
– सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल.
‘अनलॉक-3’मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यास अनुमती
गृह विभागाकडून अनुलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिक स्वतंत्र्य दिवस साजरा करु शकणार आहेत. मात्र. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक असेल. याशिवाय सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करणं गरजेचं असेल, असा आदेश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन
दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोव परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील. केंद्रीय गृह खात्याकडून कंटेन्मेंट झोनबाबत महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत.
Unlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, नाईट कर्फ्यू हटवला, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारीhttps://t.co/8jOurZRxwz #Unlock3
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2020
Unlock-3 Guidelines Issues