जॉब पोर्टलवर रिझ्यूम टाकणं महागात, नोकरीच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक

एका तरुणाला जॉब पोर्टलवर आपलं रिझ्यूम टाकणे चागलंच महागात (online job portal scam) पडलं आहे. सायबर चोरांनी या तरुणाला खोटं जॉब पोर्टल बनवत 16 लाख 64 हजारांचा गंडा घातला आहे.

जॉब पोर्टलवर रिझ्यूम टाकणं महागात, नोकरीच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 3:23 PM

नोएडा : एका तरुणाला जॉब पोर्टलवर आपलं रिझ्यूम टाकणे चागलंच महागात (online job portal scam) पडलं आहे. सायबर चोरांनी या तरुणाला खोटं जॉब पोर्टल बनवत 16 लाख 64 हजारांचा गंडा घातला आहे. चंदन कुमार असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने दिल्लीतील नोएडामधील सेक्टर 39 मधील पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा (online job portal scam) नोंदवला आहे.

चंदन कुमार हा दिल्लीतील सेक्टर 45 सदरपूर या ठिकाणी राहतो. चंदनने गेल्यावर्षी जुलै महिन्यात नोकरीसाठी एका वेबसाईटवर आपला रिझ्यूम अपलोड केला. साधारण 1 ऑगस्टला चंदनच्या मोबाईल वर एक फोन आला. त्यावेळी त्याला समोरुन अनुप गुप्ता बोलत असून मी जॉब पोर्टलमधील अधिकारी आहे असे चोरट्यांनी (online job portal scam) सांगितले.

यानंतर त्याचा एका आयटी कंपनीसोबत कॉन्फरन्स कॉलवरुन इंटरव्ह्यूही झाला. त्यानंतर चोरट्यांनी त्याच्याकडे जॉयनिंग लेटरसाठी प्रोसेसिंग फी म्हणून 1 लाख रुपये मागितले आणि चंदनने नोकरीसाठी (online job portal scam) दिले.

यानंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा चंदनच्या मोबाईलवर फोन करत कंपनीचा एचआर असल्याचे सांगितले. राजेंद्र सिंह शेखावत असे त्या एचआरने नाव सांगत त्याला 25 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. यानंतर त्याच्याकडे अजून 70 हजार रुपये मागितले. विशेष म्हणजे एवढे पैसे घेऊनही चोरांची हौस कमी झाली नाही.

चोरांनी पुन्हा एकदा कॅनडामध्ये जॉब देतो या नावाखाली 15 लाखांची मागणी केली. सुभाष आणि आदित्य नावाच्या व्यक्तींच्या खात्यात चंदनने हे पैसे जमा केले. मात्र यानंतर चंदनने नोकरीसाठी फोन केला असता हे सर्व फोन (online job portal scam) बंद लागले. यानंतर चंदनला आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.