US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आहे.

US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य 'या' 12 राज्यांच्या हातात
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 7:03 AM

वॉशिंग्टन : सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आहे (US Presidential Election 2020). सर्वांना प्रश्न पडलाय की, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा निवडून येणार की, अमेरिकेची जनता डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन (Joe Biden) यांच्या हाती देशाची सूत्र देणार? अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये काल मतदान करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, काल व्हर्जिनियामध्ये आलेले डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला माहिती मिळाली आहे की, फ्लोरिडामधील जनता आमच्यावर विश्वास दाखवत आहे. एरिजोना आणि टेक्ससमध्येदेखील आश्चर्यकारक निकाल समोर येऊ शकतात. मला असं वाटतंय की, या सर्व गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत. सर्व गोष्टींचा विचार केला तर एकंदरित चित्र असं आहे की, आम्हाला पुन्हा चार वर्षांसाठी संधी मिळेल. यादरम्यान अमेरिकेच्या फर्स्ड लेडी मेलानिया ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये मतदान केलं.

मी अर्थव्यवस्था अजून मजबूत केली, परंतु चीनवरुन आलेल्या आजारामुळे नुकसान झालं : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली होती, परंतु चीनवरुन आलेल्या आजारामुळे या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

लोकशाही परत मिळवण्याची वेळ : बायडन

मतदानादरम्यान डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन म्हणाले की, सध्या अमेरिकन जनतेसोबत उभं राहण्याची आणि आपली लोकशाही परत मिळवण्याची वेळ आहे.

ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य या 12 राज्यांच्या हातात

अमेरिकेतील लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्याची मतं निर्धारित केलेली आहेत. जो उमेदवार त्या ठराविक राज्यांमध्ये महत्त्वाची आणि जास्तीत जास्त मतं मिळवतो तो उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता अधिक असते. अशा राज्यांना ‘पेंडुलम स्टेट’ किंवा ‘हिंज’ म्हटलं जातं. यंदाच्या निवडणुकीत अशी 12 राज्य आहेत.

यूएस टुडेच्या रिपोर्टनुसार 12 पैकी 6 अशी राज्य आहेत जी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामध्ये प्रामुख्याने नॉर्थ कॅरोलिना, फ्लोरिडा, पेन्सिलवेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन आणि एरिजोना या राज्यांचा समावेश आहे. जॉर्जिया आणि टेक्ससमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तसेच नेवाडा, आयव्हा,ओहायो आणि न्यू हॅम्पशायर राज्यदेखील महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.

सर्वात महत्त्वाचं राज्य कोणतं?

अमेरिकेत डेलीगेट्स संख्येवरुन 415 डेलीगेट्ससह कॅलिफोर्निया राज्य सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर 228 डेलीगेट्ससह टेक्सस राज्य दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं राज्य आहे. तसेच 110 डेलीगेस्टसह नॉर्थ कॅरोलिना तिसऱ्या क्रमांकावर आहे. या डेलीगेट्सचं महत्त्वं केवळ प्राथमिक निवडणुकीत असते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेलीगेट्स ऐवजी इलेक्टरचं महत्त्व अधिक असतं.

20 जानेवारीला शपथविधी

अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे. यासाठी अमेरिकेची संसद म्हणजेच कॅपिटल बिल्डींग आणि इतर भागात जोरदार तयारी सुरू आहे. कॅपिटल बिल्डींग परिसरात सुशोभीरकरण करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराची भीती?

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेत हिंसाचार होण्याच्या शक्येतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. FBI आणि NSA या सुरक्षा संस्थांनी याबाबत एक रिपोर्ट दिला आहे.व्हाईट हाऊसच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी आणि दुकानदारांनी त्यांची कार्यालये आणि दुकांनाच्या काचा लाकडी आच्छादनाने झाकण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प हॉटेलच्या समोरील भागातील बिल्डींमध्येही लोक सुरक्षेच्या उपाययोजना करत आहेत. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबत वृत्त दिले आहे.

ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलनादरम्यान हिंसा

अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलन झाले होते. त्या दरम्यान वॉशिग्टनमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली होती. आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर हिंसा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

संबंधित बातम्या

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात

US Election 2020 live: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचलं

US Presidential Election | सर्व्हेमध्ये पिछाडीवर असणारे डोनाल्ड ट्रम्प ‘या’ गोष्टीत आघाडीवर

(US Election 2020 : future of Donald Trump and Joe Biden is in the hands of 12 important states)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.