न्यूयॉर्क: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प टॉवर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराभोवती मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हिंसेच्या भीतीने शहरातील अनेक भाग सील करण्यात आला आहे. (America presidential election 2020, Large police force deployed in New York City)
मतमोजणी सुरु झाल्यावर ट्रम्प टॉवर आणि ट्रम्प यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येनं नागरिक जमले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांचे विरोधी ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’च्या आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यावेळी परिसरातील दुकानांचं मोठं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर मॅनहॅटन परिसरातील अनेक भाग बंद करण्यात आल्याची माहिती न्यूयॉर्क पोलिसांनी दिली आहे. न्यूयॉर्कच्या ज्या भागात नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी मोठ्या ट्रकमध्ये वाळू भरुन ठेवली आहे. मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाल्यास ते रोखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अमेरिकेतील 50 राज्यांपैकी 41 राज्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली आहे. तर फक्त 9 राज्यांमधील मतमोजणी बाकी आहे. पेंसिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असल्याचं कळतंय. तर टेस्कास, साऊत कैरोलिना आणि ओक्लाहोमामध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. असं असलं तरी सध्या जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, उर्वरित 9 राज्यांचा निकाल हाती आल्यानंतरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार?, की जो बायडन इतिहास घडवणार हे स्पष्ट होणार आहे.
US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात
America presidential election 2020, Large police force deployed in New York City