US Election : ट्रम्प-बायडनमध्ये कोण जिंकणार? सनी लिओनी म्हणते ‘ही आतुरता माझा जीव घेतेय’

पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार की ट्रम्प यांना पराभूत करुन जो बायडन सत्तेत येणार या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सर्वचजण आतूर आहेत.

US Election : ट्रम्प-बायडनमध्ये कोण जिंकणार? सनी लिओनी म्हणते 'ही आतुरता माझा जीव घेतेय'
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 5:44 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालावर जगाचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार की ट्रम्प यांना पराभूत करुन जो बायडन सत्तेत येणार या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सर्वचजण आतूर आहेत. मतदान पूर्ण झालंय आणि आता संपूर्ण अमेरिकेत मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत मोठे बदल होतील असं तज्ज्ञ सांगत आहेत (US election result 2020 Sunny Leone shares pic with Daniel Weber exicited for result).

सध्या इलेक्टोरल मतांमध्ये जो बायडन पुढे आहेत. मात्र, त्यांना मिळालेली आघाडी तशी फार मोठी नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हा आघाडीचा ट्रेंड बदलणार की पराभूत होणार हे पाहावं लागणार आहे. हीच उत्सुकता अभिनेत्री सनी लिओनी हिलाही असल्याचं दिसून आलंय. तिने आपला एक फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

The suspense is killing me!!! @dirrty99

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लिओनी अमेरिकेच्या निवडणुकीबाबत खूपच उत्सुक आहे. मतमोजणीत ट्रम्प आणि बायडन यांच्यातील समतुल्य लढत तिच्यासाठी देखील आतुरता वाढवणारी आहे. सनी अमेरिकेच्या निकालावर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे. नुकताच सनी लिओनीने सोशल मीडियावर आपला पती डॅनिअल वेबरसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत सनी आणि डेनिअल दोघांनीही अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान केल्याचंही तिने सांगितलं आहे. तसेच त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलंय.

सनीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटलं आहे की ‘ही आतुरता माझा जीव घेते आहे’. सनी लिओनीची ही आतुरता अगदी स्वाभाविक मानली जात आहे. कारण अमेरिकेत कोण सत्तेवर आहे याचा जगातील अनेक महत्त्वाच्या धोरणांवर परिणाम होत असतो. त्यामुळेच जगभरातील लोकांचं या निकालाकडे लक्ष असून कोण जिंकून येतो याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत.

असं असलं तरी केवळ आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो शेअर करणाऱ्या सनीला अमेरिकेतील निवडणुकीसाठीची उत्सुकता तिच्या चाहत्यांना मात्र काहीसा धक्का देणारी आहे. याआधी सनीने थेट राजकीय घडामोडींमध्ये कधीही रस दाखवलेला नाही. त्यामुळेच तिची ही पोस्ट विशेष मानली जात आहे.

संबंधित बातम्या :

US Presidential Election: काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा, ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला वादग्रस्त नकाशा

US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात

US election result 2020 Sunny Leone shares pic with Daniel Weber exicited for result

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.