Corona Virus : वधू-वराकडून मास्क लावून कोरोना व्हायरसची जनजागृती
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती केली (Use mask bridal and groom) जात आहे.
हैद्राबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती केली (Use mask bridal and groom) जात आहे. या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशमध्येही एका लग्नात वधू-वराने मास्क लावून लोकांमध्ये जनजागृती (Use mask bridal and groom) केली.
हे लग्न आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्याच्या उंगटूर मंडळ येथे झाले. या लग्नात वधू-वर तसेच उपस्थित सर्व कुटुंबियांनीही मास्क लावले होते. वधू-वराने मास्क लावत सर्व विधी पूर्ण केल्या. मंगळसूत्र बांधण्याची विधीही त्यांनी मास्क लावून केली. सर्व कुटुंबियांनी मास्क लावून या विधी पूर्ण करत वधू-वराला आशिर्वाद दिला. विशेष म्हणजे फोटो काढतानाही मास्क लावण्यात आले होते.
या वधू-वराचे लग्न आधीच ठरले होते. याच दरम्यान कोरोना विषाणूची साथ पसरली. त्यामुळे लग्नात सर्व पाहुणे मास्क घालून उपस्थित होते. या लग्नामुळे सुरक्षेसोबत समाजातही जनजागृतीचाही संदेश गेला आहे.
“कोरोना विषाणूला घाबरु नका, तर या विषाणूपासून स्वत: बचाव करण्यासाठी मास्कचा उपयोग करा. सतर्कतेसाठी शासन आणि डॉक्टरद्वारे देण्यात आलेल्या सूचनेचे पाल करा”, असं या नवं दाम्पत्यांनी सांगितले.