चेहरा-केसात होळीचे रंग अडकलेत? दहा सोप्या टिप्स
यंदा तुम्हाला अशा त्रासाशिवाय जर चेहऱ्यावरचा रंग काढायचा असेल तर या काही उपयुक्त टिप्सचा नक्की उपयोग (Remove hair Color Face-Hair) करा.
मुंबई : होळीनंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करायला सर्वांना (Remove hair Color Face-Hair) आवडते. पण यानंतर चेहऱ्यावर, केसाला लागलेला रंग काढण्यात फार त्रास सहन करावा लागतो. बाजारातील केमिकलयुक्त रंग चेहऱ्यावरुन निघता निघत नाही. यामुळे चेहरा आणि केसावरील रंग काढण्यासाठी तासनतास शॅम्पू आणि साबण चेहऱ्यावर लावून चेहरा घासावा लागतो. यंदा तुम्हाला अशा त्रासाशिवाय जर चेहऱ्यावरचा रंग काढायचा असेल तर या काही उपयुक्त टिप्सचा नक्की उपयोग (Remove hair Color Face-Hair) करा.
चेहरा आणि केसावरुन रंग काढण्यासाठी टिप्स
1. त्वचेवरुन रंग काढण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा. 2. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर सरळ केसांना शॅम्पू लावू नका. त्याऐवजी केसांना दही किंवा अंड्यातील पांढरा भाग लावा. त्यानंतर तासाभराने केस धुवा 3. जर तुम्ही केसांना अंड किंवा दही लावू शकत नसाल तर केसांना नारळाच्या दूधाने धुवा. त्यानंतर शॅम्पू लावा. 4. चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी गव्हाच्या पीठात तेल किंवा लिंबाचा रस मिसळून पातळ पेस्ट करा. ही पेस्ट अंघोळीपूर्वी आपल्या त्वचेवर लावा. यामुळे रंग लवकर उतरण्यास मदत होईल. 5. केसावरील रंग काढण्यासाठी केस किंवा चेहरा सतत धुवू नका. 6. चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. 7. रंगपंचमी दिवशी लागलेले रंग काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फेशियल किंवा ब्लीच करु नका. 8. मानेवरील किंवा हाताचा रंग काढण्यासाठी बेसन, दही आणि हळदीची एकत्र पेस्ट करुन लावा. 9. जर तुम्ही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाने होळी खेळला असाल, तर लगेचच स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. 10. नखांवर लागलेला रंग काढण्यासाठी टुथपेस्ट लावून नख घासा