भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध, घरमालकीणीने नवऱ्याला संपवलं
उत्तर प्रदेशातील महिलेचे भाडेकरु तरुणीशी समलैंगिक संबंध होते. या संबंधांना पतीने विरोध केल्यामुळे दोघींनी मिळून पतीचा काटा काढला. Aligarh Woman Kills Husband
लखनौ : भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावेत, यासाठी घरमालकीणीने नवऱ्याची हत्या केली. उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. भाडेकरु आणि घरमालकीणीने मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. (Aligarh Woman Kills Husband)
अलिगढमधील कुंवरनगर भागात राहणाऱ्या भूरीसिंग गोस्वामी यांचा मृतदेह होळीच्या रात्री एका नाल्यात सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं असता, त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी भूरीसिंग यांची पत्नी रुबीकडे विचारपूस केली. त्यावर, पती होळीनिमित्त पैसे घेण्यासाठी बाहेर गेला होता, परंतु तो घरी परतला नाही, अशी माहिती तिने दिली.
होळीच्या दुसर्या दिवशी मयत भूरीसिंग यांचा भाऊ किशन गोस्वामीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्या भावाची पत्नी रुबी, त्यांचा भाडेकरु हरिओम डब्बू आणि त्याची पत्नी रजनी यांच्यावर हत्येचा आरोप केला. हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले.
भूरीसिंगची पत्नी रुबीचे भाडेकरु रजनीशी समलैंगिक संबंध होते. भूरीसिंग यांना या संबंधांविषयी समजताच त्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे रुबी आणि रजनी यांनी होळीच्या रात्री त्याची हत्या करण्याची योजना आखली. विशेष म्हणजे एक महिन्यापासून दोघींनी भूरीसिंगचा काटा काढण्यासाठी कट रचला होता.
हेही वाचा : अल्पवयीन तरुणाला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी, विवाहितेवर गुन्हा
होळीच्या दिवशी भूरीसिंगला रुबी आणि रजनी यांनी दारु पाजली. तो नशेत असल्याची संधी साधून त्याचा गळा आवळला. भूरीसिंगच्या भावावर हत्येचा संशय यावा, यासाठी रुबीने पतीचा मृतदेह भावाच्या घराजवळ असलेल्या नाल्यात फेकला.
पोलिसांनी भादंवि कलम 147, 302, 120 ब आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. महिलांनी हत्येसाठी वापरलेला दोर आणि टेपही जप्त करण्यात आली आहे. (Aligarh Woman Kills Husband)
VIDEO : Corona BREAKING : ठाणे : कोरोनाबाधित रुग्ण सापडला, ठाण्यातही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू #Thane #coronavirus #coronavirusinindia #CoronavirusPandemic #Covid_19 pic.twitter.com/jK8AOcMbxM
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2020