योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ' असं असणार आहे.

योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 10:35 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ’ असं असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (24 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या विमानतळाचं काम सुरु असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे (Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport).

अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. बुद्धांची जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असलेल्या कुशीनगर आणि जेवरमध्ये देखील अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधातही (Love Jihad) अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असं आहे. योगी सरकारच्या कॅबिनेटने आज (24 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत लव जिहादसह 21 प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. या नव्या कायद्यात लव जिहाद प्रकरणांमध्ये पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट बैठकीची माहिती देताना सांगितलं, “राज्यात सातत्याने लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून लग्न केलं जात आहे. तसेच त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे. हे रोखण्यासाठी नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.”

या नव्या कायद्यानुसार नाव आणि धर्म लपवून लग्न करणे आणि फसवणूक करण्यावर आळा बसेल, असा दावा मौर्या यांनी केलाय. जबरदस्तीने धर्मांतरण करणं चुकीचं आहे आणि आता या कायद्याप्रमाणे अशा दोषींवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.