‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. भाजप यूवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

'हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे', ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:36 PM

हैदराबाद: ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं मैदान चांगलंच तापली आहे. या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हैदराबाद दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगीरी इथं रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहोत, असं वक्तव्य केलं. त्यामुळे हैदराबादेतील राजकारण आता चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.(Uttar Pradesh cm yogi adityanath on Hyderabad municipal corporation election)

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. भाजप यूवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हैदराबाद दौऱ्यापूर्वी MIM चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘भाजप सर्जिकल स्ट्राईक करेल तर जनता 1 डिसेंबरला डेमोक्राटिक स्ट्राईक करेल’, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केलीय. तर ‘आम्ही ना योगींना घाबरू, ना चहा वाल्यांना, या देशावर जेवढा मोदींचा अधिकार आहे, तेवढाच अकबरुद्दीनचाही आहे’, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

भाजपकडून विधानसभेची तयारी

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यात TRS, MIM, काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. मात्र, मुख्य लढत ही भाजप आणि MIM मध्ये सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

तेलंगनामध्ये तेलंगण राष्ट्र समिती मजबूत असली तरी चंद्राबाबू नायडू यांच्यावर लोकांची नाराजी पाहायला मिळतेय. तर इथं काँग्रेस कमजोर आहे. हैदराबादेत भाजप ओवेसींची ताकद कमी करण्यात यशस्वी ठरली तर विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याचा मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी है तो मुमकीन हैं : योगी आदित्यनाथ

‘बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं’, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी बिहार विधानसभा निकाल आणि विविध राज्यांत पार पडलेल्या पोटनिवडणुकांच्या निकालाचं वर्णन केलं. “देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या उत्तुंग कामावर विश्वास आहे. त्यांचं काम जनतेच्या मनात आहे. त्याचमुळे या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाल पसंती दिली”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं : योगी आदित्यनाथ

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Bihar election result 2020: बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा भाजपला मोठा फायदा, प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

Uttar Pradesh cm Yogi Adityanath on Hyderabad municipal corporation election

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.