घराच्या छतावर दोन बॅगा सापडल्या, 40 लाखांचे रोकड-दागिने पाहून कुटुंब अवाक

मीरतमध्ये राहाणाऱ्या कुटुंबाच्या घराच्या छतावर चोरीचा मुद्देमाल भरलेल्या दोन बॅगा ठेवण्यात आल्या होत्या.

घराच्या छतावर दोन बॅगा सापडल्या, 40 लाखांचे रोकड-दागिने पाहून कुटुंब अवाक
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 7:23 PM

लखनौ : घराच्या छतावर सापडलेल्या दोन बॅगांमध्ये रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून उत्तर प्रदेशातील कुटुंब अवाक झाले. 14 लाखांच्या नोटा आणि दागिने मिळून मुद्देमालाची किंमत अंदाजे चाळीस लाखांच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे. शेजारील घरात झालेल्या चोरीनंतर चोराने घाईगडबडीत या बॅगा तिथे लपवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (Uttar Pradesh family found 2 bags full currency and gold house roof)

मीरतमधील मिशन कम्पाऊण्ड भागात ही जबरी चोरी झाली होती. बॅगा सापडल्यानंतर प्रामाणिक शर्मा कुटुंबाने याची माहिती पोलिसांना दिली. गाद्यांचा व्यवसाय असलेल्या पवन सिंघल यांच्या घरात एका दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा हा मुद्देमाल होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने याविषयी बातमी दिली आहे.

पवन सिंघल यांच्या शेजारी राहणाऱ्या वरुण शर्मा यांच्या घराच्या छतावर चोरीचा मुद्देमाल भरलेल्या दोन बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. “सकाळी मी आमच्या घराच्या छतावर दोन बॅगा पाहिल्या. त्या उघडून पाहिल्या तर आत चलनी नोटा भरलेल्या होत्या. या चोरीच्या असतील, अशी शंका मला आलीच. मी लगेच पोलिसांना याविषयी माहिती दिली. नंतर घेऊन जाण्यासाठी चोराने त्या बॅगा आमच्या छतावर ठेवल्याची शक्यता आहे.” असं वरुण शर्मा म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी सिंघल कुटुंबाच्या घरी काम करणाऱ्या राजू नेपाळीवर पोलिसांची संशयाची सुई आहे. दीर्घ काळ बेपत्ता असलेला राजू नुकताच मीरतमध्ये परतला. घरातील पुरुष मंडळी त्यांच्या दुकानात गेली होती, तर महिलावर्ग खरेदीसाठी बाहेर पडला होता. घराची इत्यंभूत माहिती असलेल्या व्यक्तीने चोरी केल्याचा पोलिसांचा संशय होता. चोरी केल्यानंतर घराबाहेर पडलेला राजूही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

परिचित असल्याने सुरक्षारक्षकांनीही राजूला थांबवलं नव्हतं. चोरी केल्याचं पकडलेल्या सुरक्षारक्षकाला राजूने चोरीतील हिस्सा दिल्याचंही समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. पवन सिंघल यांनी दागिन्यांची किंमत अद्याप सांगितलेली नाही. घरातून गहाळ झालेल्या दागिन्यांची यादी करुन रितसर तक्रार नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र इतर कुटुंबीयांनी दागिने चाळीस लाखांचे असल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या :

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

(Uttar Pradesh family found 2 bags full currency and gold house roof)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.