लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद, मजूर हैद्राबादहून नागपुरात चालत, यूपीच्या कुटुंबाची 97 तास पायपीट

| Updated on: Apr 17, 2020 | 4:50 PM

उत्तरप्रदेशात राहणारे 10 ते 12 मजूर हैद्राबादवरुन पायी चालत नागपूरपर्यंत आल्याची घटना नुकतीच समोर आली (Laborer walk From Hyderabad to Nagpur) आहे.

लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद, मजूर हैद्राबादहून नागपुरात चालत, यूपीच्या कुटुंबाची 97 तास पायपीट
Follow us on

नागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Laborer walk From Hyderabad to Nagpur) देशभरात 3 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मजूर हे पायपीट करत आपल्या मूळ गावी जात आहे. अशाचप्रकारे उत्तरप्रदेशात राहणारे 10 ते 12 मजूर हैद्राबादवरुन पायी चालत नागपूरपर्यंत आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे कोणतेही वाहन मिळत नसल्याने या मजुरांनी 350 किमीचा प्रवास पायी चालत केला. यानंतर आता लेकरा-बाळांसह ते उत्तरप्रदेशातील मूळ गावी निघाले आहेत.

हातात लहान लेकरं, महिला आणि पुरुष हे कुटुंब मूळचे (Laborer walk From Hyderabad to Nagpur) उत्तर प्रदेशमधील आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. काहीही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. तसेच घरमालकाला भाडं देण्यासाठी पैसे नाहीत. मग इथे राहायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. त्यामुळे ही लोक हैद्राबादवरून नागपूर आणि नागपूरहून उत्तरप्रदेशात पायपीट करत निघाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत जवळपास 97 तासांचा प्रवास पायी चालत केला आहे.

आतापर्यंत या कुटुंबाने नागपूरपर्यंतचा प्रवास आपल्या चिमुकल्यांसोबत केला आहे. रस्त्यात खाणं पिणं अशा अनेक समस्या यांच्यासमोर आहेत. त्यांच्यासोबत असलेली लहान मुलं रडत आहे. मात्र त्यांच्याजवळ कोणताही पर्याय नाही, असेही ते सांगतात.

हे मजूर पायी चालत असताना नागपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला दिसले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यांचे दुःख जाणून घेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली.

लॉकडाऊनमुळे काम नाही. लहान मुलं आणि महिला सुद्धासोबत आहे. त्यामुळे त्यांनी आता नागपूरपर्यंतचा प्रवास तर केला. मात्र  नागपूरवरुन आता ते पुढच्या प्रवासासाठी निघाले आहेत. यापुढचा प्रवास फार मोठा आहे. त्यामुळे तो कसा पूर्ण करणार असा प्रश्न त्यांना पडला (Laborer walk From Hyderabad to Nagpur) आहे.