उत्तरप्रदेशात कार आणि बसमध्ये भीषण धडक, 7 लोकांचा मृत्यू, 32 जखमी
उत्तरप्रदेशातील पीलीभीतजवळील नॅशनल हायवे 30 वर एका बुलैरो कार आणि बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. (Uttar Pradesh Pilibhit Bus-Bolero Accident)
लखनौ : उत्तरप्रदेशातील पीलीभीतजवळील नॅशनल हायवे 30 वर एका बुलेरो कार आणि बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. यात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत यात जवळपास 32 लोक जखमी झाले आहेत. (Uttar Pradesh Pilibhit Bus-Bolero Accident)
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील पूरनपूर परिसरातील एका कार आणि बसमध्ये भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातग्रस्त झालेली बस बाजूला असलेल्या शेतात कोसळली. ही बस लखनौहून पीलीभीत या ठिकाणी जात होती. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते.
तर बुलेरो कार ही पूरनपूरमधून पीलीभीत या ठिकाणी येत होती. यातही अनेक प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. पहाटे 3 ते 4 च्या सुमारास हा अपघात घडला.
7 dead and 32 injured after a bus and a Bolero collided with each other in Puranpur area: Jai Prakash, SP Pilibhit pic.twitter.com/l918gQiwIR
— ANI UP (@ANINewsUP) October 17, 2020
दरम्यान या अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
या दुर्घटनेतील बहुतांश जखमी हे पीलीभीत परिसरात राहणार आहेत. त्यामुळे पीलीभीत परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची अधिक चौकशी करत आहेत. (Uttar Pradesh Pilibhit Bus-Bolero Accident)
संबंधित बातम्या :
नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं
गिरणा धरणात अज्ञाताकडून विषप्रयोग, मोठ्या प्रमाणावर मासे मृत, दादा भुसेंकडून चौकशीचे आदेश