जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी
Follow us
| Updated on: Jul 17, 2019 | 6:16 PM

सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा गोळीबार गावाचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आलं. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेटची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांना स्वत: या घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना आरोग्यासेवा पुरवण्यात कुठलाही हलगर्जीपणा होता कामा नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईतील टीव्ही अँकरला अश्लील मेसेज, विकृताला पश्चिम बंगालमधून अटक

किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड

VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.